Beed: शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर; 100 कोटींच्या भूमीपूजन कार्यक्रमाला सेनेचा विरोध Saam TV
महाराष्ट्र

Beed: शिवसेना-राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर; 100 कोटींच्या भूमीपूजन कार्यक्रमाला सेनेचा विरोध

महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेल्या आहेत.

विनोद जिरे

बीड: बीडमध्ये विकास कामावरून शिवसेना - राष्ट्रवादीमधीक अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून येण्याची शक्यता आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यक्रमाला शिवसेनेच्या माजी जिल्हाध्यक्षांनी थेट विरोध दर्शविला आहे. महाविकास आघाडी सत्तेवर आल्यापासून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बीड मतदारसंघातील कामांना विशेष मंजुरी दिलेल्या आहेत. मात्र शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या कामांना राष्ट्रवादीच्या स्थानिक नेतृत्वाकडून आडकाठी आणली जात आहे. हा प्रकार न थांबविल्यास बीड जिल्ह्यात उद्घाटन दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवणार आहोत. जर उद्घाटन ऑनलाईन असेल तर प्रतीकात्मक पुतळा उभारून, निषेध व्यक्त करणार आहोत. असा इशारा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे.

महाविकास आघाडी स्थापन (Mahavikas Aghadi) होऊन दोन वर्षे पूर्ण झाली. राज्याच्या हिताच्या व सर्वसामान्यांच्या उत्कर्षासाठी आघाडीची स्थापना करण्यात आली. विकासाला गती मिळावी म्हणून समान विकास कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. परंतु, याचा बीड मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेतृत्वाला विसर पडला आहे. शिवसेनेच्या मंत्री आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीने आलेल्या विकासकामांना राष्ट्रवादीचे स्थानिक नेतृत्व आडकाठी आणत आहे. याबाबत वरिष्ठांना आपण कळविले आहे.

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची होत असलेली अडवणूक येत्या काळात न थांबविल्यास, बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर सोमवारी असलेल्या उपमुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवनार असुन .. ऑनलाईन उदघाटन जरी असेल तरी अजित दादांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला काळे झेंडे दाखवू. असा इशारा सणसणीत इशारा शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी दिला आहे. यामुळं पुन्हा एकदा बीडमध्ये शिवसेना- राष्ट्रवादीमधील वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'पंतप्रधान माझा फोन टॅप करतात'; राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर गंभीर आरोप

Saturday Horoscope : आजचा दिवस आनंदात जाईल! या ५ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होणार

Drought in Maharashtra: महाराष्ट्रात केंद्रीय मदतीचा 'दुष्काळ'; राज्यातील शेतकऱ्यांना केंद्राकडून वाटाण्याच्या अक्षता

अजितदादांच्या अपघात आणि घातपात मागे असलेल्यांना वाचवणारा नेता कोण? मफलरवाल्या पोस्टरने राजकारण तापलं!

Assam Kaziranga Accident: डोळ्यांच्या पापण्या लवते न लवते तोच अनर्थ घडला! भरधाव ट्रॅव्हलर थेट कंटेनर ट्रकवर आदळला; २४ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT