Beed Shirur Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Beed Shirur News: ढाकणे पिता-पुत्राला होणार अटक? ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल

Beed violence case: ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल. या प्रकरणाचा अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांकडून सुरू.

Bhagyashree Kamble

बीडमधील शिरूरमध्ये ढाकणे पिता पुत्रावर झालेल्या मारहाणप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. ढाकणे पिता पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटी आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. शालन भोसले यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, ढाकणे पिता पुत्राने तक्रारदार महिलेच्या मुलांवर हल्ला केलाय. या प्रकरणी महिलेनं पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

गेल्या काही दिवसांपासून ढाकणे पिता पुत्रावर झालेल्या हल्ल्यामुळे बीड हादरलं होतं. हरणाची शिकार करताना आडवलं म्हणून ढाकणे पिता पुत्राला मारहाण करण्यात आली होती. या प्रकरणात ढाकणे पिता-पुत्राने सतीश भोसले उर्फ खोक्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तसेच त्याला अटक झाली पाहिजे, अशी मागणी ढाकणे कुटुंब आणि गावकऱ्यांनी केली होती.

मात्र, आता ढाकणे पिता-पुत्रासह इतर दोघांविरोधात ॲट्रॉसिटीसह पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'आमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो', अशी भीती पिता पुत्राने यापूर्वी व्यक्त केली होती. त्यामुळे सतीश भोसलेला अटक न करता, ढाकणे पिता पुत्रावर गुन्हा दाखल झाल्यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केलाय.

शालन भोसले (वय वर्ष ४०) असे तक्रारदार महिलेचं नाव आहे. महिलेनं शिरूर पोलीस ठाण्यात दिलीप ढाकणे, महेश ढाकणे, संदिप ढाकणे आणि राम ढाकणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

महिलेनं तक्रारीत नेमकं काय म्हटलंय?

महिलेनं दाखल केलेल्या तक्रारीत म्हटलं की, ढाकणे कुटुंबातील सदस्यांनी महिलेच्या मुलांना शेतात डुक्कर पकडण्याचा फास लावण्यासाठी बोलावून घेतले होते. दुसऱ्या दिवशी डुक्कर फासामध्ये अडकले आहे का? हे पाहण्यासाठी महिलेची दोन्ही मुलं शेतात गेले होते.

त्यानंतर महिलेच्या मुलीला आणि मुलाला शिवीगाळ केली. नंतर मुलीला शेतात पाडून तिचा विनयभंग केला. विनयभंग करून तिच्या ओटीपोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच मुलाच्या डोक्यावर तलवारीनं वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT