Beed News Saam Tv News
महाराष्ट्र

Beed News: आता QR कोडद्वारे दाखल करा तक्रार, बीड पोलीस अधीक्षकांचा नवा उपक्रम

QR code police initiative in Beed: क्यू आर कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील बरीच माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच तक्रार देखील दाखल करता येणार आहे.

Bhagyashree Kamble

नागरिक आणि पोलीस दलामध्ये सुसंवाद व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 'संवाद प्रकल्प' हा उपक्रम राबवला आहे. क्युआर कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील बरीच माहिती सामान्य नागरीकांना मिळणार आहे. तसेच नागरीकांना तक्रार देखील दाखल करता येणार आहे. संवाद उपक्रमामुळे नागरिक आणि पोलिसांमध्ये असलेली दरी दूर होईल, असं पोलीस अधिक्षकांनी सांगितलं आहे.

बीडमध्ये पोलीस अधिक्षकांनी राबवलेल्या उपक्रमामुळे सध्या त्यांचं कौतूक होत आहे. बीड जिल्ह्यात नागरिक आणि पोलीस दलामध्ये सुसंवाद व्हावा, या दृष्टिकोनातून पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी 'संवाद प्रकल्प' हा उपक्रम राबवला आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून पोलीस स्टेशनमधील बरीच माहिती नागरिकांना मिळणार आहे. तसेच तक्रार देखील दाखल करता येणार आहे.

यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांनी क्यू आर कोड तयार केला आहे. हा क्यू आर कोड पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांच्या कक्षात आणि पोलीस ठाणे अंमलदार यांच्या कक्षात लावण्यात येणार आहे. मोबाईलद्वारे क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर सामान्यांना माहिती मिळणार आहे. विशेष म्हणजे पोलिसांच्या कामगिरीचे गुणांकन देखील याच फॉर्मच्या माध्यमातून केले जाणार आहे.

एखादी व्यक्ती पोलीस ठाण्यातील कामकाजाबाबत असमाधानी असेल तर, त्यांची पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून २४ तासांच्या आत समस्या जाणून घेऊन, त्याचे निराकरण करता येईल. हा क्यू आर कोड सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरीकांपर्यंत पोहचवला जाणार आहे. तसेच जर एखाद्या व्यक्तीला अवैध धंदे किंवा इतर महत्त्वाची गोपनीय माहिती द्यायची असेल तर, क्यू आर कोडच्या माध्यमातून माहिती आपण देऊ शकता.

नागरीकांनी दाखल केलेली तक्रार, दिलेली प्रतिक्रिया आणि सूचना पोलीस अधिक्षकांना स्वतः पाहता येणार आहे. तसेच नागरीकांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल पोलीसांकडून घेतली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आंदोलन

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT