Kalyan Crime News  Saam TV
महाराष्ट्र

पल्लवी चव्हाण यांची आत्महत्या की हत्या ? मृतदेह आढळला विहिरीत

पल्लवी चव्हाण यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

विनोद जिरे

बीड : गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या विवाहित महिलेचा (women) विहिरीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना बीडच्या (Beed) जप्ती पारगाव गाव परिसरात उघडकीस आली आहे. पल्लवी सखाराम चव्हाण (वय 19 राहणार हिरापूर) असं मृत विवाहितेचे (married) नाव आहे. (beed crime news)

पल्लवी चव्हाण या गत तीन दिवसांपासून बेपत्ता होत्या. यादरम्यान त्यांचा शोध सुरू असताना शनिवारी उशिरा त्यांचा मृतदेह जप्ती पारगाव शिवारातील सुनील हिंगेकर यांच्या शेतात असलेल्या विहिरीत आढळल्याने खळबळ उडाली आहे.

याबाबतची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह विहिरी बाहेर काढत घटनास्थळाचा पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी पल्लवी चव्हाण यांची आत्महत्या की हत्या ? याचा शोध पोलीस घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan Crime : खडवली नदीकाठी तरूणाचा मृतदेह आढळला; पोलिसांना वेगळाच संशय

Vastu Shastra: या ५ गोष्टी चुकूनही कोणाला भेट देऊ नका; नातं तुटण्याची असते दाट शक्यता

Divyanka Sirohi Death: रील बनवताना खाली कोसळली; लोकप्रिय अभिनेत्रीचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन

पाणी जपूनच वापरा! उजनी, वैतरणा ते कोयना, जायकवाडी; राज्यातील कोणत्या धरणात किती पाणीसाठा? अधिकृत आकडेवारी समोर

Maharashtra News Live Update: विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत माझे चांगले संबंध- खासदार अशोक चव्हाण

SCROLL FOR NEXT