Breaking Beed : करुणा मुंडेंच्या गाडीत आढळली पिस्तूल! पोलिसांनी घेतले ताब्यात  विनोद जिरे
महाराष्ट्र

Breaking Beed : करुणा मुंडेंच्या गाडीत आढळली पिस्तूल! पोलिसांनी घेतले ताब्यात

दरम्यान सापडलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून त्याचा परवाना आहे की नाही ? तसेच करुणा शर्मा या पिस्तूल घेऊन परळीत का आल्या ? त्यांचा काही घातपात करण्याचा उद्देश तर नव्हता ना ? याचाही तपास परळी पोलिस करत आहेत.

विनोद जिरे

बीड : गेल्या दोन दिवसापूर्वी करूणा मुंडे (Karuna Munde) यांनी धनंजय मुंडे यांच्यासंदर्भात अनेक गोष्टींचा पुराव्यानिशी खुलासा करणार असल्याचे फेसबुक लाइव्द्वारे जाहीर केले होते. तसेच या सर्व बाबी आपण परळीत (Parali) येऊन पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडणार असल्याचे सांगितले होते. आपल्याला जिवंत जाळण्याच्या आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्या तरीही, पत्रकार परिषद घेणारच अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. त्यामुळे बीडसह (Beed) संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली होती.

हे देखील पहा -

करुणा मुंडे या दुपारी परळीत दाखल झाल्या व त्यानंतर त्यांनी प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना काही महिलांकडून धक्काबुक्की झाल्याने गोंधळ उडाला होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून करुणा मुंडे यांना परळीच्या शहर पाण्यात बसवलं होतं. मात्र पोलीस ठाण्याबाहेर महिलांसह धनंजय मुंडे यांच्या कट्टर समर्थकांनी प्रचंड गर्दी करत, करुणा मुंडेंविरोधात जोरदार घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आमच्या साहेबाला बदनाम करायला परळीत आलाय का ? असा सवाल करत धनंजय मुंडे समर्थक महिलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला व घेराव घातला. यावेळी करुणा मुंडेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली. त्यामुळे करुणा मुंडे ज्या गाडीने आल्या होत्या, त्या इनोव्हा क्र.एम. एच.04, एच.एन. 3902 या गाडीची पोलिसांनी तपासणी केली.

यावेळी गाडीच्या मागच्या डिक्कीत एक पिस्टल सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान सापडलेले पिस्तूल पोलिसांनी जप्त केले असून त्याचा परवाना आहे की नाही ? तसेच करुणा शर्मा या पिस्तूल घेऊन परळीत का आल्या ? त्यांचा काही घातपात करण्याचा उद्देश तर नव्हता ना ? याचाही तपास परळी पोलिस करत आहेत. दरम्यान, करुणा मुंडे या परळीत दाखल झाल्यानंतर आणि त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्यानंतर परळीत प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं पुन्हा महागलं! १० तोळ्याागे ७७०० रुपयांची वाढ; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात युद्धांतील मृत सैनिकांचा सन्मान कसा केला जात असे?

Box Office Collection: 'धुरंधर'ने मारली बाजी, केलं कोट्यवधींच कलेक्शन; जाणून घ्या कार्तिक आर्यनच्या चित्रपटाची कमाई

Gajkesari Rajog 2026: 2 जानेवारीपासून चमकणार या राशींचं भविष्य; 12 वर्षांनी बनणार शक्तीशाली गजकेसरी राजयोग

SCROLL FOR NEXT