Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर हातोडा; माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर गुन्हा

Beed News : वैजनाथ देवस्थान ट्रस्टने हे शिवलिंग काढून ही जागा बंद केल्याने माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी आता आक्रमक भूमिका घेतली होती

विनोद जिरे

बीड : बीडच्या परळीतील वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर तोडफोड करून शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात आले होते. मात्र मंदिराच्या शिखरावर हातोडा चालवल्याप्रकरणी माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यावर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


परळीच्या (Parali) वैद्यनाथ मंदिर शिखराच्या पायथ्याला शिवलिंग होते. जुन्या काळापासून या ठिकाणी परळीकर दर्शनाला जायचे. मात्र वैजनाथ देवस्थान ट्रस्टने हे शिवलिंग काढून ही जागा बंद केल्याने माजी नगराध्यक्ष दिपक देशमुख यांनी आता आक्रमक भूमिका घेतली होती. दीपक देशमुख यांनी दसऱ्याच्या दिवशी वैद्यनाथ मंदिराच्या शिखरावर (Beed) पोहचून हातोडा चालवला होता. याच शिखरावर शिवलिंग असल्याचा दावा करत पिढ्यानपिढ्या याची पूजा देशमुख घराण्याच्या माध्यमातून केली जाते. असं म्हणत त्यांनी या शिखरावर हातोडा चालवला होता. याचा व्हिडिओ त्यांनी स्वतः सोशल माध्यमावर व्हायरल देखील केला. 

अखेर गुन्हा दाखल 

दरम्यान वैद्यनाथ देवस्थान ट्रस्टने याप्रकरणी परळी शहर पोलीसात धाव घेतली होती. आता याची गंभीर दखल घेत देशमुख यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल झाला असला तरी पोलीस अधिक काय कारवाई करते ? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Daily Makeup Tips: ५ मिनिटांत व्हा तयार! या क्विक डेली मेकअप टिप्स नक्की वापरा, मिळेल ग्लॅमरस लूक

Pregnancy Care: उन्हाळ्यात प्रेग्नन्सी? डिहायड्रेशनपासून वाचण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाच्या टिप्स

EPFO Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची संधी; EPFO मध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Accident : मुंबईत हिट अँड रनचा थरार, भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक; आरोपी फरार

Maharashtra Live News Update: वसईतील स्वघोषित भोंदू बाबावर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT