Beed Parali News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : खोटा धनादेश देणं पडले महागात; सराफ व्यापाऱ्याला ६ महिने कारावास, ६ लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा

Beed News : धनादेश खोटा असल्याने धनादेश बँकेत वटला नाही. धनादेश न वटल्यामुळे दादाराव संभाजी मुंडे यांनी परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली

Rajesh Sonwane

बीड : उसनवारीने घेतलेले पैसे परतफेड करताना खोटा धनादेश दिला. याबाबत संबंधित व्यक्तीने केलेल्या आरोपावरून (Beed) बीडच्या परळी येथील सराफा व्यापाऱ्यास न्यायालयाने शिक्षा (Court Judge) सुनावली आहे. यात सराफ व्यापाऱ्याला ६ महिने कारावास व ६ लाख रुपये नुकसान भरपाईची शिक्षा ठोठावली आहे. (Maharashtra News)

बीड जिल्ह्यातील परळी शहरातील आरोपी सचिन किशनराव दहिवाळ (जिरेवाडीकर) यांनी व्यवसायासाठी हातउसणे म्हणून दादाराव संभाजी मुंडे यांच्याकडुन ४ लाख रुपये घेतले. सदरची रक्कम परतफेडीकरिता ४ लाखाचा आयडीबीआय बँक शाखा परळी वैजनाथ या बँकेचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश खोटा असल्याने धनादेश बँकेत वटला नाही. धनादेश न वटल्यामुळे दादाराव संभाजी मुंडे यांनी (Parali) परळी न्यायालयात फिर्याद दाखल केली. या प्रकरणाची सुनावणी परळी न्यायालय झाली. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

न्यायालयाने सुनावली शिक्षा 

फिर्यादीचा युक्तीवाद मान्य करून आरोपी सचिन किशनराव दहिवाळ यास ६ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच आरोपींने फिर्यादीस ६ लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी. नुकसान भरपाई न दिल्यास आरोपीला पुन्हा तीन महिना कारावास भोगावा लागणार आहे. सदर रक्कमेवर ९ टक्के व्याज द्यावे लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : सावध राहा! 6 राशींच्या आयुष्यात येणार मोठा बदल; पैसा, करिअर अन् नात्यांमध्ये काय घडणार?

Animal Facts : कोणता प्राणी उभा राहून झोपतो? ९०% लोकांना माहितीचं नाही

कुछ बडा होनेवाला है! 48 आमदारांना पीएम मोदींनी दिलं नवं मिशन; केजरीवालांसह राहुल गांधींना बसणार मोठा धक्का

देशात 'नमो'ची लाट परत आणण्यासाठी भाजपनं आखली नवी रणनीती; राज्यात ‘नमो सेवा’चा शुभारंभ

3 Gram Mangalsutra For Women: महिलांसाठी 3 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र, रोज घालण्यासाठी एकदम बेस्ट

SCROLL FOR NEXT