Parali Accident Saam tv
महाराष्ट्र

Parali Accident : बोअरच्या गाडीचा विद्युत तारांना स्पर्श; दोन कामगारांचा मृत्यू, २ जण जखमी

Beed News : परळी शहरालगत असणाऱ्या वाघबेट येथे पाण्याचा बोअर करण्यासाठी आले होते. सकाळी बोअरिंगच्या कामाला सुरवात झाली. काम आटोपल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली होती.

विनोद जिरे

बीड : बोअरिंग करण्यासाठी जात असलेल्या बोअरच्या गाडीचा विद्युत वाहक तारांना स्पर्श झाल्याने गाडीवरील २ कामगारांचा जागीच (Death) मृत्यू झाला. तर अन्य २ कामगार जखमी झाले आहेत. या अपघाताचा थरार (Beed) बीडच्या परळी शहराजवळ दुपारच्या सुमारास घडला. (Maharashtra News)

सदरची घटना परळी (Parali) शहरालगत घडली असून जखमींवर परळी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेत गोविंदा धवन सिंग व संदीप (रा. ओडिसा) मृत झालेल्या कामगारांचे नाव आहे. हे कामगार परळी शहरालगत असणाऱ्या वाघबेट येथे पाण्याचा बोअर करण्यासाठी आले होते. सकाळी बोअरिंगच्या कामाला सुरवात झाली. काम आटोपल्यानंतर गाडी मार्गस्थ झाली होती. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

परिसरात धावपळ 

बोअर करण्याचे काम झाल्यानंतर गाडी परळी शहराकडे जाण्यासाठी मार्गस्थ झाली होती. परळी शहर काही अंतरावर असताना हा थरारक (Accident) अपघात झाला. अपघात झाल्याने परिसरात असलेल्या नागरिकांची धावपळ सुरु झाली होती. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: आपच्या 7 खासदारांना दिलासा, भाजप प्रवेशाला मंजुरी

Garam Pani Kund In Mandla History: बापरे चमत्कारच! बाराही महिने गरम पाणी वाहणारं हे कुंड नेमकं आहे तरी कुठे?

Pune : पुण्यातील नामंकित कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रॅगिंग; ५ जणांवर गुन्हा

मुंबईहून १६६ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या विमानात तांत्रिक बिघाड; भोपाळमध्ये केलं एमर्जन्सी लँडिग

लग्नाचं वचन देऊन Bigg Boss फेम अभिनेत्रीने 9 कोटींना लुटले; NRI तरुणाचा गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

SCROLL FOR NEXT