Dhangar Reservation Saam tv
महाराष्ट्र

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Beed News : आठवडाभरापूर्वीच गेवराई तालुक्यात एका धनगर समाजाच्या बांधवाने आरक्षणासाठी आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा एक घटना समोर आली असून आठवडाभरापूर्वी तरुणाने आत्महत्या केल्याची घटना.

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : राज्यात आरक्षणाचा मुद्दा गाजत आला आहे. दरम्यान आरक्षणासाठी समाज बांधव टोकाचा निर्णय घेत जीवनयात्रा संपविल्याच्या घटना राज्यात घडल्या आहेत. अशात धनगर समाजाच्या आरक्षणासाठी धनगर समाज बांधवाने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात उघडकीस आली आहे. दरम्यान आरक्षणासाठी आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट आढळून आली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. 

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे सदरची घटना घडली असून योगेश बबन चौरे (वय ३३) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. योगेश चौरे हा आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनात सक्रिय सहभागी झाला होता. आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने योगेश चौरे याने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. यामुळे समाज बांधव आक्रमक झाले असून योगेशच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. 

सुसाईट नोट लिहत संपविले जीवन  

आरक्षणाचा तिढा सुटत नसल्याने दरम्यान याच ठिकाणी एक सुसाईड नोट आढळून आली असून पोलीस या अनुषंगाने माहिती आणि तपास करत आहेत. दरम्यान आत्महत्याग्रस्त कुटुंबाला न्याय मिळावा या मागणीसाठी धनगर समाजाचे नेते भारत सोन्नर यांच्यासह धनगर समाजाने मादळमोही पोलीस चौकीत ठिय्या मांडला आहे.

आठवडाभरात दुसरी घटना 

आरक्षणासाठी टोकाचा निर्णय घेत आत्महत्या केल्याच्या घटना राज्यात घडत आल्या आहेत. अशीच घटना बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यात घडली असून मागील आठवडाभरापूर्वीच गेवराई तालुक्यात एका धनगर समाजाच्या बांधवाने आत्महत्या केली होती. हे प्रकरण ताजे असताना आता पुन्हा अशीच एक घटना समोर आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime: मौलवीकडून १४ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, पीडितेने दिला बाळाला जन्म

Maharashtra Live News Update: सुनेत्रा पवारच राष्ट्रवादीच्या अध्यक्ष होणार : प्रफुल्ल पटेल

Famous Youtuber: प्रसिद्ध युट्यूबरच्या दोन्ही बायका एकाच वेळी प्रेग्नेंट; नेटकऱ्यांना बसला धक्का म्हणाले, 'हा पण ट्रेंड...'

Long Hair Gajra Hairstyle: लांब केसांसाठी गजरा माळणाच्या 5 युनिक हेअरस्टाईल्स, पारंपारिक लूक दिसेल उठून

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसांचा राजीनामा, कारण काय?

SCROLL FOR NEXT