Beed News Young man jumps from water tank for Maratha reservation at Ambajogai Saam TV
महाराष्ट्र

Maratha Aarakshan: आरक्षणाची मागणी करत 2 तास घोषणाबाजी केली, नंतर पाण्याच्या टाकीवरुन मारली उडी, भयंकर घटना

Ambajogai Maratha Aarakshan News: आरक्षणाच्या मागणीसाठी एका मराठा तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून 2 तास आंदोलन केलं. त्यानंतर एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा देत, टाकीवरून उडी घेतली.

Satish Daud

Beed Ambajogai Maratha Aarakshan News

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सरकारने तातडीने आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी मराठा आंदोलकांकडून केली जात आहे. यासाठी अनेक ठिकाणी आंदोलने देखील केली जात आहेत. एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलकांना आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका, असं आवाहन करत असताना दुसरीकडे बीडमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरक्षणाच्या मागणीसाठी एका मराठा तरुणाने पाण्याच्या टाकीवर चढून 2 तास आंदोलन केलं. त्यानंतर एक मराठा, लाख मराठा अशी घोषणा देत, टाकीवरून उडी घेतली. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे.

थरकाप उडवणारी ही घटना अंबाजोगाई तालुक्यातील (Beed News) गिरवली गावात शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. शत्रुघ्न काशीद असे आत्महत्या केलेल्या मराठा तरुणाचे नाव आहे. त्याच्या मृत्युने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) देण्याची मागणी आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या समर्थनासाठी शत्रुघ्न शुक्रवारी रात्री पाण्याच्या टाकीवर चढला. तिथे त्याने दोन तास आरक्षणाची मागणी करत घोषणाबाजी केली.

इतकंच नाही, तर  मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्याशी बोलण्याचीही इच्छा व्यक्त केली. त्यानंतर जरांगे पाटील यांच्याशी बोलणं करून दिले होते. पोलिसांनी शत्रुघ्नची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र तो मागणीवर ठाम राहिला. अखेर त्याने टाकीवरून उडी मारून आपले जीवन संपवले.

दरम्यान, शत्रुघ्न याने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना शहरात वाऱ्यासारखी पसरली. घटनेची माहिती मिळताच परिसरातील अनेक मराठा बांधवांनी गिरवली गावात गर्दी केली. शत्रुघ्न याच्या आत्महत्येनंतर नातेवाईक आणि मराठा क्रांती मोर्चाने त्याचा मृतदेह अंबाजोगाई शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावर ठेवून ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: चांदोली धरणातून‌ 4 हजार 500 क्युसेक विसर्ग

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Raj Thackeray Look: डोळ्याला गॉगल अन् गळ्यात मफलर; विजयी मेळाव्यातील राज ठाकरेंचा स्टायलिश लूक

Sushil Kedia: 'मला माफ करा, राज ठाकरेंचा आदर करतो'; मनसेच्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडिया वठणीवर

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

SCROLL FOR NEXT