Maratha Reservation Beed News Saam tv
महाराष्ट्र

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा पुन्हा एक बळी? आरक्षण मिळत नसल्याने तरूणाने संपविले जीवन

Beed News : मराठा आरक्षणाचा पुन्हा एक बळी; आरक्षण मिळत नसल्याने तरूणाने संपविले जीवन

विनोद जिरे

बीड : मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचे आंदोलन तीव्र झाले असताना देखील शासन अजून आरक्षणाचा (Maratha Aarkshan) निर्णय घेत नाही. आरक्षण मिळावे यासाठी तरूणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे बोलले जात आहे. ही धक्कादायक घटना (Beed) बीडच्या पाटोदा तालुक्यातील मयुर नायगाव येथे घडलीय. (Maharashtra News)

गोविंद औटे अस आत्महत्या केल्या तरुणाच नाव आहे. मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांपूर्वी धाराशिव येथे एका ३० वर्षीय तरुणाने आत्महत्या केली होती. यानंतर बीडच्या पाटोदा तालुक्यातील नायगांव मयूर येथिल गोविंद औटे यांनी शेतातील झाडास फाशी घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणासंदर्भात वारंवार मोर्चे, आंदोलने, रास्ता रोको करूनही सरकार ठोस उपाययोजना घेत नाही. आरक्षण लढ्यात तरुणाने आपली जिवन यात्रा संपवली. गोविंद त्याच्या आत्महत्याने औटे कुटुंब उघड्यावर पडले आहे.

रस्त्यावर मांडला ठिय्या 

गोविंद हे मराठा आरक्षण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते होते. आत्महत्येनंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. आणखी किती बळी सरकारला मराठा समाज तरुणांचे घ्यायचे आहेत; असा प्रश्न विचारत रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे बीड पाटोदा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.  

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: NEETचा पेपर पुन्हा फुटला? टेलिग्रामवरून NEETची प्रश्नपत्रिका व्हायरल?

बेस्टचा संप, रिक्षाचालकांकडून लूट, सामच्या स्टिंगमध्ये लुटीचा पर्दाफाश

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का बसणार? ठाकरेसेनेचे 14 आमदार फूटणार; राजकारणात खळबळ

ओमराजे फुटले, 15 हजार फॉलोअर्स घटले, सोशल मीडियावर ओमराजेंविरोधात संताप

फुलांच्या वर्षावात, राजाभाऊ नाशकात, कोट्यवधींची ऑफर धुडकावणारे राजाभाऊ, ठाकरेंच्या निष्ठावानानं फोडलं ऑपरेशन टायगरचं बिंग

SCROLL FOR NEXT