Ambajogai Sugar Factory Saam tv
महाराष्ट्र

Ambajogai News : व्यंकटेश्वरा साखर कारखान्याच्या कामगारांचे वेतनासाठी धरणे; पाच महिन्याचे वेतनच नाही

Beed News : पूर्वी हा साखर कारखाना भाजप नेते रमेश आडसकर यांच्या ताब्यात होता. तेव्हा कारखाना बंद असताना कामगारांना अर्ध वेतन देण्यात येणार होते.

विनोद जिरे

बीड : अंबाजोगाई येथील व्यंकटेश्वरा शुगर लिमिटेड या साखर कारखान्याकडून गेल्या ५ महिन्यापासून कामगारांना (Beed) वेतन मिळालेले नाही. यामुळे कामगार संघटनेने गेल्या दोन दिवसापासून बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Sugar Factory) उपोषण सुरू केलं आहे. तरी देखील पगार देण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या नाही. (Latest Marathi News)

बीडच्या अंबाजोगाई येथील वाघाळा येथे असलेला व्यंकटेश्वरा शुगर लिमिटेड हा कारखाना यावर्षी बंद आहे. मात्र गेल्या वर्षी कारखाना सुरू होता. तरी देखील कामगारांचे वेतन अद्यापही मिळाले नाही. त्यामुळे या कामगारांनी वेतन मिळावं यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केल आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान पूर्वी हा साखर कारखाना (BJP) भाजप नेते रमेश आडसकर यांच्या ताब्यात होता. तेव्हा कारखाना बंद असताना कामगारांना अर्ध वेतन देण्यात येणार होते. मात्र ते देखील अद्याप देण्यात आलेले नाही. तर दुसरीकडे कारखान्यामध्ये काम करणाऱ्या एकाही कामगाराला भविष्य निर्वाहनिधी मिळालेला नाही. त्यामुळे तात्काळ पाच महिन्याचे वेतन आणि भविष्य निर्वाह निधी देण्याची मागणी या कामगारांनी केली आहे. तर आंदोलन करून देखील वेतन न मिळाल्यास साखर आयुक्तांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Frequently Headache Problem: तुम्हालाही सतत डोकेदुखीचा त्रास आहे का? जाणून घ्या यामागची छुपी कारणे आणि घरगुती उपाय

Maharashtra News Live Update: सुप्रिया सुळे यांनी आंदोलन करणाऱ्या मुलींशी फोनवरून साधला संवाद

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

SCROLL FOR NEXT