Beed News Saam Tv
महाराष्ट्र

Beed: मेटे साहेबांच्या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे; कार्यकर्त्यांची मागणी

आमदार विनायक मेटेंच्या कार्यकर्त्यांचा आक्रोश

विनोद जिरे

बीड - शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या अपघाती निधन झाल्यानंतर, आता बीडमध्ये कार्यकर्त्यांनी एकच आक्रोश केला आहे. बीड (Beed) नगरपालिकेचे नगरसेवक दत्ता गायकवाड हे विनायक मेटे यांचे कट्टर समर्थक आणि कार्यकर्ते समजले जातात. त्यांनी आज शिवसंग्राम भवनमध्ये एकच आक्रोश करत हंबरडा फोडला आहे.

दरम्यान आमदार विनायक मिटे यांचा अपघात नसून घातपात झाल्याचा संशय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला असून या अपघाताची चौकशी झालीच पाहिजे. अशी मागणी देखील यावेळी कार्यकर्त्यांनी केली आहे.

हे देखील पाहा -

मुंबई-पुणे एक्सप्रेसवर हा अपघात झाला असून पहाटे 5:30 वाजता भातान बोगद्याजवळ ही घटना घडली. मेटे यांच्या गाडीला अनोळखी वाहनाला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, गाडीचा पुढील भाग चक्काचूर झाला आहे. तसेच अपघात झाला तेव्हा विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत असल्याचंही सांगितलं जातं आहे.

अपघातात त्यांच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर जवळपास एक तासभर मेटे यांना कुठलीही मदत मिळाली नव्हती. यानंतर मेटे यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दरम्यान उपचारादरम्यान मेटे यांचं निधन झालं असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे.

विनायक मेटे यांचा मुलगा देखील यावेळी त्यांच्यासोबत गाडीत असल्याने त्यालाही किरकोळ जखम झाल्याची माहिती आहे. विनायक मेटे यांच्या झालेल्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळाला मोठा हादरा बसला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: एमआयएम नगरसेवक मतीन पटेलची एसआयटीकडून साडेसात तास चौकशी

'धनंजय मुंडेंनी गाडी आडवी लावली, हवेत दोन गोळ्या झाडल्या'; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

महिला नेत्याच्या हत्येचा कट उधळला; ISI साठी काम करणारा तरुण दहशतवाद विरोधी पथकाच्या ताब्यात

Coconut Ladoo Recipe: घरच्या घरी बनवा स्वादिष्ट नारळाचे लाडू; फक्त काही मिनिटांत तयार होणारी सोपी रेसिपी

Viral Video : ३ वर्षांचं मूल कडेवर घेऊन ट्रेनमध्ये चढत होती महिला; तोल जाऊन खाली पडली, दोन्ही पाय तुटले

SCROLL FOR NEXT