Beed News Maratha Aarkshan Saam tv
महाराष्ट्र

Beed News : मराठा आरक्षणासाठी महिला आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग रोखला

Beed News : मराठा आरक्षणासाठी महिला आक्रमक; राष्ट्रीय महामार्ग रोखला

विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणासाठी आंदोलन अधिक तीव्र होत आहे. राज्यातील अनेक भागात आंदोलन होत असून (Beed) बीडच्या माजलगावमध्ये महिला देखील आक्रमक झालेल्या पाहण्यास मिळाल्या. (Maratha Aarkshan) मराठा आरक्षण तात्काळ द्या; या मागणीसाठी महिलांनी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. (Tajya Batmya)

बीडच्या माजलगावमध्ये महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. यावेळी सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी करत रस्ता रोको करत आंदोलन करण्यात आलं आहे. कल्याण - विशाखापटनम राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या माजलगाव शहरातील केसापुरी कॅम्पजवळ महिलांनी १ तास रास्ता रोको करण्यात आला. यामुळे महामार्गावर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. 

आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्या 
यावेळी मराठा समाजास कुणबी जातीचे प्रमाणपत्र देऊन सरसकट (Maratha Reservation) ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे. अशी मागणी या महिलांनी केली. यावेळी शेकडो महिला रस्ता रोकोमध्ये सहभागी झाल्या होत्या. मराठा आरक्षण आंदोलनातील आंदोलकावरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावे. मराठा आरक्षण आंदोलकावरील झालेल्या हल्याची चौकशी करून दोषीवर योग्य कारवाई करावी; अशी मागणी महिलांनी केली. दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raghav and Shehnaaz: राघव जुयाल-शहनाज गिल रिलेशनशिपमध्ये? बर्थडे पार्टीनंतरची 'ती' मूव्हमेंट कॅमेऱ्यात कैद

Vande Bharat Sleeper: मुंबई-बंगळुरू प्रवास आता आणखी सुसाट! देशातील दुसरी 'वंदे भारत स्लीपर' तयार; किती डबे अन् मार्ग कोणता?

मिमिक्री अर्टिस्ट बोलायला लागले; मुख्यमंत्र्यांचा राज ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला

Health Care : महिनाभर केळी खाल्ली तर शरीवर काय परिणाम होतो?

Maharashtra News Live Update: अनेक लोकांना माझ्या भाषणाने मिरची लागली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT