Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीड जिल्ह्यातील आठवडी बाजार मतदानाच्या दिवशी राहणार बंद; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आदेश

Beed News : विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क सर्वाना बजावता यावा; यासाठी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे

विनोद जिरे

बीड : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. त्यानुसार येत्या २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या दिवशी बीड जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजार बंद ठेवण्याबाबत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आदेश काढले आहेत. 

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhan Sabha Election) कार्यक्रमानुसार २० नोव्हेंबरला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानाचा हक्क सर्वाना बजावता यावा; यासाठी मतदानाच्या दिवशी सुटी जाहीर करण्यात आली आहे. मात्र व्यावसायिक व बाजारातील विक्रेते आपला व्यवसाय बंद ठेवत नाही. परिणामी अनेकजण मतदानाच्या हक्कापासून दूर राहत असतात. यामुळे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आठवडे बाजार बंद ठेवण्याबाबत आदेश काढले आहेत.  

अन्य दिवशी भरविला जाणार बाजार 

बीड (Beed News) तालुक्यातील चौसाळा, गेवराईतील गेवराई, गुळज, मारफळा, राजपिंप्री, मालेगाव खु., किनगाव, शिरूर कासारमधील जाटनांदूर, मातोरी, पाटोद्यातील पिठ्ठी, आष्टी तालुक्यातील पिंपळा, दौलावडगाव, खडकत, आष्टा ह.ना. केरूळ, डोईठाण, हातोला, माजलगाव तालुक्यातील मोठेवाडी, एकदरा, गंगामसला, माजलगाव, वडवणी तालुक्यातील वडवणी, अंबाजोगाईतील लोखंडी सावरगाव, केजमधील लव्हुरी, बोरगाव बु., परळी तालुक्यातील पोहनेर, नागापूर याठिकाणी बुधवारी आठवडे बाजार भारत असतो. अर्थात मतदानाच्या दिवशी भरणारे आठवडी बाजार अन्य दिवशी भरविण्यात यावे, असेही आदेशात नमूद आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer Prevention: 'हे' विशेष प्रथिने कर्करोग वाढण्यापूर्वीच थांबवतात, जाणून घ्या कार्य कसे करते

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला उपवासाचे नियम आणि पूजा विधी जाणून घ्या

Metro In Dino Collection : 'मेट्रो इन दिनों'ची उंच भरारी, वीकेंडला किती कोटींची कमाई?

व्हायरल होण्यासाठी जीवाशी खेळ; रील्ससाठी धावत्या ट्रेनखाली झोपली तरुणी; VIDEO

Heart Attack: हार्ट अटॅक आणि कार्डियक अरेस्टमध्ये फरक काय?

SCROLL FOR NEXT