Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Child Marriage: आष्टीत २ बालविवाह थांबविले; चाईल्ड लाईन आणि पोलिसांची कारवाई

आष्टीत २ बालविवाह थांबविले; चाईल्ड लाईन आणि पोलिसांची कारवाई

विनोद जिरे

बीड : बीड जिल्‍ह्यात बालविवाह झालेल्‍या अनेक प्रकार समोर आले आहेत. असे असताना देखील (Beed) बीडच्‍या आष्‍टी तालुक्‍यात दोन बालविवाह थांबविले आहेत. चाईल्‍ट लाईन व पोलिसांनी ही कारवाई केली आहे. (Latest Marathi News)

आष्टी तालुक्यातील बीड- नगर राज्य महामार्गावरील दोन मंगल कार्यालयात या दोन अल्पवयीन मुलींचे विवाह होणार आहेत. अशी माहिती चाईल्ड लाइनकडून अंभोरा पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे, चाईल्ड लाईन सदस्य तत्वशील कांबळे, धामणगांव येथील ग्रामसेवक सायंबर यांनी दोन्ही ठिकाणी जाऊन होणारे बालविवाह (Child Marriage) रोखले आहेत.

आई– वडीलांना समज देवून सोडले

आष्टी (Ashti) तालुक्यात १६ आणि १७ वर्षीय अशा दोन अल्पवयीन मुलींचा बालविवाह चाईल्ड लाईन आणि पोलिसांनी थांबविला आहे. दरम्यान यावेळी मुलीच्या आई– वडिलांना तिचे वय पूर्ण झाल्यावरच लग्न लावून द्या, अशी समज देण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT