Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

इंस्टाग्रामवर ओळख..नंतर मैत्री व प्रेम; प्रेमातून तरुणीवर अत्याचार, चोरून काढलेले फोटो केले व्हायरल

इंस्टाग्रामवर ओळख..नंतर मैत्री व प्रेम; प्रेमातून तरुणीवर अत्याचार, चोरून काढलेले फोटो केले व्हायरल

विनोद जिरे

बीड : इंस्टाग्रामवर ओळख झाली. यानंतर मैत्री व मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेमातून बीडच्या तरुणीवर पुण्यात (Pune) अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. विशेष म्हणजे अत्याचारादरम्यान (Crime News) पीडितेचे चोरून काढलेले अश्लील फोटो देखील आरोपीने व्हायरल केले आहेत. (Maharashtra News)

पीडितेच्या फिर्यादीवरून तिचे इन्स्टावर स्वतःचे अकाउंट आहे. या अँपद्वारे तिची (Beed News) आरोपी शेख शरीफ (रा. सांडस रांजणगाव, जि. पुणे) याच्‍याशी 2020 मध्ये ओळख झाली. त्यानंतर ते व्हॉट्सॲपवरूनही (Whats app) एकमेकांशी बोलत होते. या ओळखीतून त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. त्यानंतर तिला पुण्यात बोलावून एका लॉजवर नेत अत्याचार केला. दरम्यान या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून बीडच्या शिवाजी नगर पोलीस ठाण्यात विनयभंग, बलात्कार, माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यातील आरोपी फरार असून शिवाजीनगर (Police) पोलीस तपास करत आहेत.

चोरून काढले फोटो अन्‌ केला व्‍हीडीओ‌

पिडीतेवर अत्‍याचार करत असताना आरोपीने तिला न कळू देता व्हिडिओ बनवला. तसेच अश्लील फोटोही काढले. त्याआधारे नंतर त्याने ब्लॅकमेलिंग सुरू केली. तर ब्लॅकमेलिंगमधून पैसे निघाले नाहीत; म्हणून आरोपीने पीडितेचे फोटो तिच्या 50 मैत्रिणींना पाठवले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT