Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : गावातील ४ शेतकऱ्यांच्या ८ जनावरांची चोरी; गाय नेताना चोरटे सीसीटीव्हीत कैद

Beed News : शेतकरी हा शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुभती जनवारे गाई, म्हशी व तसेच शेतीसाठी लागणारे बैल जोडी हे पालन करत असतो.

Rajesh Sonwane

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील गोदाकाठावर असणाऱ्या सादोळा गावासह परिसरातील गावांमध्ये पशुधन चोरट्यांची (Beed) दहशत पसरली आहे. चोरीच्या वाढत्या घटनेने शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून सादोळा शिवारातील आखाड्यात असणाऱ्या गाईची चोरी करताना चोरटे सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. विशेष म्हणजे या गावात तब्बल चार ते पाच शेतकऱ्यांचे ८ जनावरे चोरीला गेले आहे. (Breaking Marathi News)

गोदाकाठावरील शेतकरी हा सदन शेतकरी (Farmer) म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पाण्याचे प्रमाण मुबलक असल्यामुळे येथील शेतकरी हा शेतीसोबतच जोडधंदा म्हणून दुभती जनवारे गाई, म्हशी व तसेच शेतीसाठी लागणारे बैल जोडी हे पालन करत असतो. परंतु, गेल्या महिनाभरापासून सादोळा शिवार व गावामध्ये जनावरे चोरांनी (Animal Theft) धुमाकूळ माजवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाला असून तात्काळ चोरट्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी देखील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पोलिसात गुन्हा दाखल 

बीड जिल्ह्यातील सादोळा गावातील शेतकरी कैलास प्रकाशराव सोळंके यांच्या शेतातील शेडमध्ये बांधून ठेवलेली गाय चोरट्यांनी चोरून नेत असतानाचे दृश्य सीसीटीव्ही कमेऱ्यात कैद झाले आहे. तर पवन दीपकराव सोळंके यांची बैलजोडी गावातील घरापासून चोरी झाली आहे. शेतकरी संदीपान मोरे यांचा एक बैल चोरी झालेला आहे. तसेच सादोळा येथील शेतकरी संजू सोळंके यांचे तीन बैल एक गाय हे त्यांच्या आखाड्यावरून चोरट्यांनी चोरी केले आहेत. याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिल्ली स्फोटाचे महाराष्ट्रात कनेक्शन? पुण्यासह राज्यात ATS ची छापेमारी, ४ डॉक्टरांचा पर्दाफाश होणार

Mumbai News: सेप्टिक टँक साफ करताना मुंबईत मोठी दुर्घटना, एका कामगाराचा मृत्यू; दुसऱ्याची प्रकृती चिंताजनक

IPhone Camera : कोणत्याही आयफोनला डीएसएलआर कॅमेरामध्ये बदलू शकता, जाणून घ्या ट्रिक्स

Maharashtra Live News Update: महाराष्ट्र ATS ची पुण्यात छापेमारी

Girija Oak: निळ्या साडीत मराठमोळ्या अभिनेत्रीने सोशल मीडियावर घातलाय राडा, नॅशनल क्रश म्हणून का झाली प्रसिद्ध?

SCROLL FOR NEXT