Beed Police Saam tv
महाराष्ट्र

Beed Police: पोलीस मुख्यालयातील गोदाम फोडून ५७ गॅस टाक्याची चोरी

Beed News पोलीस मुख्यालयातील गोदाम फोडून ५७ गॅस टाक्याची चोरी

विनोद जिरे

बीड : बीड शहरातील पोलीस मुख्यालयात असलेल्या गोदामाचे कुलूप तोडून ५७ गॅसच्या रिकाम्या टाक्या चोरट्यांनी लंपास केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी बीडच्या (Beed) शिवाजीनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पोलीसांच्याच मुख्यालयात चोरी करुन चोरट्याने (Police) पोलीसांनाच आवाहन दिले आहे. (Maharashtra News)

बीड शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या गोदामात गॅसच्या रिकाम्या ठेवलेल्या ५१६ टाक्यापैकी ५७ टाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या. या टाक्यांची किंमत १ लाख ८९ हजार २२९ रुपये एवढी आहे. यावेळी मुख्यालयात असलेले नामदेव हरीभाऊ अजबे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालयातील मेन व गोदामाचे लोखंडी गेट तोडून चोरी केली आहे. 

पोलिसांना आव्हान 
दरम्यान चोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे डोस पाजणारे पोलीस (Beed Police) दलाच्या मुख्यालयातील ५७ गॅस टाक्या चोरांनी लंपास करून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rashmika - Vijay: रश्मिका आणि विजय देवरकोंडाने गुपचूप केलं लग्न? जाणून घ्या व्हायरल फोटोंमागील सत्य

Maharashtra Live News Update : अंबरनाथमध्ये २०८ संशयित बोगस मतदार ताब्यात; पोलीस चौकशी सुरू

Christmas Plum Cake : ख्रिसमससाठी बनवा ड्रायफ्रुट्सने भरलेला प्लम केक, वाचा सोपी रेसिपी

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज, खात्यात खटाखट जमा होणार ₹3000; तारीख आली समोर

Winter Skin Health : हिवाळ्यात त्वचा काचेसारखी चमकेल, दररोज 'या' 5 पैकी कोणताही एक पदार्थ खा

SCROLL FOR NEXT