Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करून रेल्वेत चोरी; रेल्वेतील प्रवाशांचे दागिने लंपास

Beed News : कोल्हापूर- नागपूर ही एक्सप्रेस मध्यरात्रीच्या सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे क्रॉसिंग साठी थांबली होती.

विनोद जिरे

बीड : परळी लोहमार्गावर थेट रेल्वेत चोऱ्यांच्या घटनेत वाढ होत आहे. याच दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानका दरम्यान कोल्हापूर- नागपूर रेल्वे गाडी क्रॉसिंगसाठी थांबली असता दोन प्रवाशांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले आहेत. मागील महिनाभरात ही चौथी घटना असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोल्हापूर- नागपूर ही एक्सप्रेस मध्यरात्रीच्या (Beed) सुमारास घाटनांदुर रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे क्रॉसिंग साठी थांबली होती. याचाच फायदा घेत चोरट्याने दोन प्रवाशांचे दागिने लंपास केले आहे. यापूर्वी देखील सिग्नलमध्ये तांत्रिक बिघाड करत चोरट्यांनी रेल्वे थांबून चोरी करण्याचा प्रयत्न केला. यात चोरीच्या घटना (Railway Police) देखील घडल्या आहे. असाच काहीसा प्रकार पुन्हा एकदा समोर आल्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

रेल्वेत रात्रीच्या सुमारास घडलेल्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान प्रवाशांच्या फिर्यादीवरून परळी रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यादृष्टीने रेल्वे पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Police Recruitment: मोठी बातमी! राज्यात ८१०० पोलिसांची भरती, अनेकांचे पोलिस होण्याचं स्वप्न होणार पूर्ण

महावितरणचा मोठा झटका! वीज बिल थकलं तर घरात लगेच अंधार; नव्या नियमाने उडाली खळबळ

Oral Health : तोंडातून वास येतोय? मग हे 5 उपाय नक्की कराच

Cabinet Decisions : २५ मोठ्या योजनांचं काय होणार? वर्षभरात ठरणार; फडणवीस सरकारने घेतले ७ मोठे निर्णय

Heart Attack : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका होईल कमी, डाएटमध्ये आजपासून समावेश करा 'या' ३ भाज्यांचा

SCROLL FOR NEXT