Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : ग्रामस्थांनी चक्क गाव काढले विक्रीला; मूलभूत सुविधा नसल्याने गावकरी संतप्त

Beed News : गावात मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यात पहावयास मिळाला आहे

विनोद जिरे

बीड : गावात सुविधांसाठी लोकप्रतिनिधींच्या मागे लागत असतात. तरी देखील सुधारणा न नसल्याने ग्रामस्थ उपोषणाला (Beed) बसतात. मात्र गावात सुविधा मिळत नसल्याने संतप्त होत ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यात घडला आहे. (Tajya Batmya)

गावात मूलभूत सोयी सुविधा नाहीत, त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी चक्क गावच विक्रीला काढल्याचा प्रकार बीडच्या पाटोदा तालुक्यात पहावयास मिळाला आहे. पाटोदा तालुक्यातील खडकवडी गावात ग्रामस्थांनी गाव विक्रीचे बॅनर लावले आहे. गावात कसल्याही सुविधा नसल्याने ग्रामस्थांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बॅनर लावले आहे. त्यावर थेट गाव विक्री करण्याची अनुमती मागण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

योजना केवळ कागदावरच 

गावाच्या विकासासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. शिवाय ग्रामपंचायतीला थेट निधी देखील येत असतो. मात्र १८०० लोकसंख्या असलेल्या गावात शासनाच्या अनेक योजना कागदोपत्रीच झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गाव विक्री करण्याचे बॅनर लावल्याने या गावाची जिल्हाभरात चर्चा सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजीत दिपके पुन्हा दिल्लीमधील आंदोलनात सहभागी होणार

Congress Protest Live Update : राहुल गांधींच्या नेतृत्वात इंडिया आघाडीचा थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत मेगा मोर्चा; दिल्लीत हायव्होल्टेज ड्रामा

Political News : दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दांडी, महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

OTT Releases : 'या' आठवड्यात ओटीटीवर काय पाहाल? नव्या चित्रपटांसह वेब सीरिज अन् रिॲलिटी शोची मेजवानी!

धक्कादायक! मेट्रोमध्ये फक्त सीटवरून वाद, तरूणाचा करुण अंत; आरोपीचं हायप्रोफाईल कनेक्शन समोर

SCROLL FOR NEXT