Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: कुटुंबीय मंदिरातील सप्‍ताहात लीन; मुलाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू

कुटुंबीय मंदिरातील सप्‍ताहात लीन; मुलाचा तलावाच्या पाण्यात बुडुन मृत्यू

विनोद जिरे

बीड : बीडच्या बेलेश्वर संस्थान परिसरातील तलावात १० वर्षीय मुलाचा मृतदेह (Beed) आढळल्याने एकचं खळबळ उडाली. शिवराय अशोक वायभट (रा. पिंपरनई) असं मयत मुलाचे नाव आहे. (Maharashtra News)

बीड येथील बेलेश्वर मंदिरात तीन दिवसीय सप्ताह सुरू आहे. या सप्ताहसाठी मंदिरात शिवराय व कुटुंबीय आले होते. सप्‍ताहात सुरू असलेल्‍या कार्यक्रमात कुटुंबीय लीन असताना मुलगा तेथून मंदिराच्‍या बाहेर पडला. आपला मुलगा न दिसल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधाशोध सुरू केली. आजूबाजूच्‍या परिसरात देखील विचारपूस केली. परंतु, मुलगा दिसून आला नाही.

तलावाकाठी कपडे व चप्‍पल

या दरम्यान याच मंदिरा लगत असणाऱ्या तलावाच्या काठावर कपडे व चप्पल आढळली. यादरम्यान गावकाऱ्यांसह नेकनूर पोलिसांनी पाण्यात उतरून पाहिलं असता शिवरायचा मृतदेह मिळून आला. दरम्यान मयत शिवराय नेमकं पोहण्यासाठी तलावात गेला होता की त्याचा घातपात झाला? याचा तपास नेकनूर पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

Gautami Patil : गौतमी पाटीलचा आजवरचा सर्वात बोल्ड अन् ग्लॅमरस अंदाज, फोटो पाहून तुम्हीही म्हणाल 'कडक'

"ओमराजे परत जा!" MPSC आंदोलनात शिंदेंच्या खासदाराविरोधात जोरदार घोषणाबाजी, वातावरण तापले

SCROLL FOR NEXT