Beed Georai Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Beed News : सुनेच्या हत्येनंतर सासूचाही संशयास्पद मृत्यू, धक्कादायक घटनेनं बीड जिल्ह्यात खळबळ

Beed Georai Crime News : विवाहित महिलेला जबरदस्ती विष पाजून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील जोडवाडी येथे घडली होती.

Satish Daud

विवाहित महिलेला जबरदस्ती विष पाजून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराई तालुक्यातील जोडवाडी येथे घडली होती. याप्रकरणी चकलांबा पोलिसांनी मृत महिलेच्या सासरकडील मंडळींवर गुन्हा दाखल केला होता. ही घटना ताजी असतानाच आता मृत महिलेच्या सासूचाही संशयास्पद मृत्यू झाला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला असून तिचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा शोध सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोडवाडी येथील विवाहिता प्रतीक्षा कोकाटे या विवाहित महिलेची तिच्या सासरकडील मंडळींनी विष पाजून हत्या केली.

लग्नात मान पान दिल्याच्या कारणावरून सासरच्या प्रतीक्षाला विष देऊन मारलं. याप्रकरणी प्रतीक्षा कोकाटे हिचा भाऊ हर्षद संतोष कळंबे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मृत महिलेचा पती संदीप कोकाटे, सासरा सखाराम कोकाटे आणि मयत सासू कुंता कोकाटे या तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.

दरम्यान, गुन्हा दाखल होताच सासूचाही संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं. प्रतीक्षा हिची सासू कुंता कोकाटे यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने गेवराईचे पोलीस उपअधीक्षक नीरज राजपूत यांनी यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाची चक्र हलवली. यावेळी मोठ्या संख्येने पोलीस गावात दाखल झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Smoking health risks: सिगारेट पिणाऱ्यांच्या आजूबाजूलाही फिरकू नका; वाढतो मृत्यूचा धोका

Urine Infection : पुन्हा पुन्हा युरिन इन्फेक्शन होतंय? महिलांनो! जाणून घ्या नेमकं कारण अन् टाळा 'या' चुका

Maharashtra News Live Update: OBCच्या हक्काला धक्का नाही – उदय सामंत

Kitchen Hacks : लाकडी चॉपिंग बोर्ड धुतल्यानंतरही दुर्गंधी येतेय? या घरगुती उपायांनी करा डीप क्लीन

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

SCROLL FOR NEXT