Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : निलंबनाचा राग, शिक्षकाने केला महिलेचा विनयभंग; बीडच्या धारुर येथील घटना

Beed News : केंद्राचे तत्कालीन प्रभारी केंद्रप्रमुख असताना केलेल्या अपहार प्रकरणी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संबंधित शिक्षकास निलंबित करण्यात आले होते.

विनोद जिरे

बीड : निलंबन कारवाईमध्ये सहभाग असल्याचा संशय आणि राग मनात धरून महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना (Beed) बीडच्या धारूर येथे उघडकिस आली आहे. या प्रकरणात पीडित महिलेच्या तक्रारीवरून धारूर पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Live Marathi News)

बीड जिल्ह्यातील धारूर (Dharur) तालुक्यातील आवरगाव येथील रमेश विष्णू नखाते यांचे अंजनडोह केंद्राचे तत्कालीन प्रभारी केंद्रप्रमुख असताना केलेल्या अपहार प्रकरणी कलम ४२० अन्वये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी संबंधित (Teacher) शिक्षकास निलंबित करण्यात आले होते. निलंबन कालावधीत रमेश नखाते याला माजलगाव गटशिक्षणाधिकारी कार्यालय देण्यात आले होते. मात्र या शिक्षकाने निलंबनामध्ये सहभाग असल्याचा समज करून धारूर येथील एका महिलेचा विनयभंग केला.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिलेले अखेर गाठले पोलीस स्टेशन 

मागील सहा महिन्यापासून त्रास देण्यास सुरुवात केली. वारंवार घरासमोर चकरा मारणे, फोन करून त्रास देणे, तसेच खालच्या भाषेमध्ये बोलत होता. हा प्रकार वारंवार होत असल्याने या त्रासाला कंटाळलेल्या महिलेने पोलीस ठाणे गाठत गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात वाळू वाहतूकदार संघटना आक्रमक

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT