Beed News Saam tv
महाराष्ट्र

शिष्यवृत्तीचा लाभ न मिळाल्‍याने विद्यार्थी आक्रमक; सरकारसह मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी

शिष्यवृत्तीचा लाभ न मिळाल्‍याने विद्यार्थी आक्रमक; सरकारसह धनंजय मुंडेंच्या विरोधात घोषणाबाजी

विनोद जिरे

बीड : गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती मिळाली नाही. त्याचबरोबर स्वाधार योजनेची रक्कम देखील देण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थ्यांना एक ना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यामुळे बीडमध्ये (Beed) रिपब्लिकन विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून विद्यार्थी रस्त्यावर उतरले. (beed news Students are aggressive scholarship benefits issue)

बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सरकार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. तसेच शिष्‍यवृत्‍ती योजनेचा लाभ मिळून देण्याची मागणी केली.

नेत्‍यांसाठी आंदोलन करायला वेळ मग विद्यार्थीसाठी नाही का?

सरकारमधील नेते आणि मंत्र्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना एखादी ईडीची (ED) नोटीस आली. तर त्यांना आंदोलने, रस्ता रोको करण्यास वेळ आहे. मात्र आमच्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वाधार योजनेची रक्कम मिळाली नाही. तर यावर बोलण्यास कोणीही तयार नाही. आंदोलन करत नाहीत. त्यामुळे सरकार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी याची दखल घेऊन आम्हाला हक्काची शिष्यवृत्ती आणि स्वाधार योजनेचा लाभ द्यावा. अन्यथा यापेक्षा उग्र आंदोलन करू, असा इशारा आंदोलक विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: मुंबई महानगर पालिकेत मोठा प्रशासकीय फेरबदल, ८०० अभियंत्यांची तडकाफडकी बदल्या

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त भागांसाठी राज्य सरकार पावले उचलेल : सुनील तटकरे

महिलांनो! वजन लय वाढलंय? Weight Loss करण्यासाठी 'या' सवयी लगेच सोडा

Health Tips: दुप्पट वेगाने कमी होईल वजन; आहारात फक्त या एका गोष्टीचा करा समावेश, ३२ वरून २८ होईल कंबर

LPG Subsidy Rule: 1 ऑक्टोबरपासून 'या' ग्राहकांना मिळणार नाही सब्सिडी; आधारचं हे काम केलं नसेल तर सब्सिडी मिळणार नाही

SCROLL FOR NEXT