Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बीडमधील जाळपोळ, दगडफेक प्रकरण; प्रमुख आरोपीसह २६२ जण ताब्यात

Beed News : आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर दगडफेक व जाळपोड करण्यात आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता

Rajesh Sonwane, विनोद जिरे

बीड : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये दगडफेक आणि (Beed) जाळपोळ करण्यात आली होती. या प्रकरणातील प्रमुख आरोपी पप्पू शिंदेसह २६२ जणांना ताब्यात घेण्यात बीड पोलिसांना (Beed Police) यश आले आहे.. तर जवळपास ३०० आरोपींची ओळख पटली असून यामध्ये आणखी चार प्रमुख आरोपी आहेत. (Breaking Marathi News)

मराठा आरक्षण (Maratha Aarkshan) मिळावे या मागणीसाठी मराठा समाजाने आंदोलन करत रस्त्यावर उतरले होते. मात्र आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यानंतर दगडफेक व जाळपोड करण्यात आल्याचा प्रकार बीडमध्ये घडला होता. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करायला सुरवात केली होती. यात आतापर्यंत २ हजार जणांची चौकशी करण्यात आली. विशेष म्हणजे जे फरार आरोपी होते आणि ज्यांना आता अटक केली आहे. अशांना कोणी मदत केली आहे? याची देखील चौकशी सुरू असून त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी साम टीव्हीशी बोलताना दिली आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरोपींना पकडण्यासाठी १२ पथक 

दगडफेक व जाळपोड करण्यामध्ये दहा टोळ्यांचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यात २६३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये पाच मुख्य आरोपींचा समावेश आहे. तर ३०० जणांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरु आहे. या ओळख पटेलल्या आरोपींना पकडण्यासाठी 12 पथके काम करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी ! मंत्रालयातील प्रतिनियुक्त अधिकाऱ्यांच्या नियुक्ता रद्द; Saam Tv इम्पॅक्ट

Clock Placement Tips: घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे? वास्तूनुसार ‘या’ ३ चुका टाळा

Sukanya Samriddhi Yojana: ₹1.5 लाख गुंतवा अन् ₹71.82 लाख मिळवा! जाणून घ्या कन्या सुकन्या समृद्धी योजनेचे गणित

Maharashtra News Live Update: कल्याणमध्ये व्हीएलसीसी संस्थेविरोधात मनसेचे ठिय्या आंदोलन

Nitin Gadkari : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्त होणार का? कालच्या त्या वक्तव्यावर थेट ऑफिसमधून स्पष्टीकरण

SCROLL FOR NEXT