Santosh Deshmukh Case Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुखांचं लोकेशन सांगणाऱ्याला क्लीन चिट, आरोपपत्रात नेमकं काय म्हटलंय?

Beed Santosh Deshmukh : ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण झाले. तेव्हा त्यांच्या लोकेशनची माहिती देणाऱ्या आरोपीचे नाव पोलिसांच्या आरोपपत्रातून वगळण्यात आल्याचे समोर आले आहे.

Yash Shirke

योगेश काशिद, साम टीव्ही, प्रतिनिधी

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मोठी अपडेट समोर आली आहे. वाल्मीक कराड हाच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये म्हटले आहे. या आरोपपत्रामधून सिद्धार्थ सोनवणे या आरोपीचे नाव कमी करण्यात आले आहे. सोनवणेने देशमुख यांचे लोकेशन इतरांना पुरवले होते.

९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्या दिवशी संतोष देशमुख हे केजहून मस्साजोगच्या दिशेने निघाल्याचे सिद्धार्थ सोनवणेने सुदर्शन घुलेला सांगितले होते. देशमुख यांचे लोकेशन दिल्याच्या आरोपाखाली सिद्धार्थ सोनवणेला ताब्यात घेण्यात आले होते. अन्य आरोपींसह त्याच्यावरही कारवाई होणार असे म्हटले जात होते.

दरम्यान सिद्धार्थ सोनवणे याच्या विरोधामध्ये सबळ पुरावे न मिळाल्याने त्याचे नाव आरोपी दोषपत्रातून कमी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ सोनवणे हा संतोष देशमुख यांच्याच मस्साजोग गावचा गावकरी आहे. त्यानेच सुदर्शन घुलेला संतोष देशमुख यांच्या लोकेशनबद्दल कळवले होते.

आरोपीपत्रातील आरोपी -

नंबर एक आरोपी - वाल्मीक कराड

नंबर दोन आरोपी - विष्णू चाटे

नंबर तीन आरोपी - सुदर्शन घुले

नंबर चार आरोपी - प्रतीक घुले

नंबर पाच आरोपी - सुधीर सांगळे

नंबर सहा आरोपी - महेश केदार

नंबर सात आरोपी - जयराम चाटे

नंबर आठ आरोपी - फरार कृष्णा आंधळे

गोपनीय साक्षीदारांंनी दिलेल्या साक्षीपुराव्यानंतर वाल्मीक कराडच्या विरुद्ध पुरावे पोलिसांना मिळाले. वाल्मीक कराडने खंडणी मागितली होती. त्यातून झालेल्या वादातून संतोष देशमुख यांची हत्या झाली. सुदर्शन घुले हा देशमुख यांना मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सीआयडीजवळ असल्याचेही समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खुलताबादच्या खंडी पिंपळगावात विहिरीत पडलेल्या बिबट्याला जीवदान

दीड, ३, ५, ७ आणि १० दिवसच गणपती का बसवतात? जाणून घ्या यामागील परंपरा

Mental Health : टेन्शन अन् थकव्याने हैराण आहात? सकाळच्या या 9 सवयी नक्की करून पाहा

मोठी बातमी! मुंबईतील मराठा आंदोलनाला परवानगी नाकारली; मनोज जरांगेंनी स्पष्टच शब्दात दिला इशारा, म्हणाले...

Sleep Schedule: कधी लवकर तर कधी उशिरा झोपता? हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो परिणाम; जाणून घ्या 'या' ७ टिप्स

SCROLL FOR NEXT