Sugarcane Worker Issue Saam tv
महाराष्ट्र

Sugarcane Worker Issue : ऊसतोड कामगारांच्या दरवाढीसाठी शरद पवार, पंकजा मुंडे करणार चर्चा; ४ जानेवारीला शिर्डीत होणार बैठक

Beed News : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार

विनोद जिरे

बीड : राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत वाढ करण्याचा प्रश्न सध्या चर्चेत आहे. यावर अद्याप निर्णय होऊ (Beed) शकलेला नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यामध्ये बैठक होणार आहे. या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. (Maharashtra News)

राज्यातील ऊसतोड कामगारांच्या मजुरीत दरवाढ करण्याचा अंतिम निर्णय राष्ट्रवादीचे नेते शरद पवार आणि ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचा लवाद घेणार. याबाबतचा निर्णय साखर संघ व (Sugarcane) ऊसतोड कामगार संघटनांच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला होता. याच अनुषंगाने ही बैठक घेऊन मजुरीबाबत तोडगा काढला जाणार.  

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

४ जानेवारीला शिर्डीत बैठक 

ऊसतोड कामगारांच्या दरवाढीचा अंतिम निर्णय शरद पवार - पंकजा मुंडे यांचा लवाद घेणार असल्यामुळे ४ जानेवारीला पवार आणि मुंडे यांची बैठक शिर्डीत होणार आहे. या बैठकीत ऊस तोडणी व वाहतूक कामगार संघटनेचे दोन- दोन प्रतिनिधी देखील उपस्थित राहतील. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात, पण ७० लाख महिलांचा हप्ता झाला बंद, कारण आलं समोर

लसीकरणानंतर चिमुकलीचा मृत्यू; आजोबा रात्रभर मृतदेह घेऊन बसले, आरोग्य यंत्रणेचा संतापजनक प्रकार

SCROLL FOR NEXT