Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : सरपंच पतीकडून मनमानी कारभार; ३५ लाखांच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप, ग्रामपंचायतीसमोर उपोषण

Beed News : ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी १५ वित्त आयोगाचा निधी थेट दिला जात असतो. तर ग्रामपंचातीवर महिला सरपंच असल्यास त्यांच्या पतीकडूनच ग्रामपंचायतींचा कारभार चालविला जात असतो

Rajesh Sonwane

योगेश काशीद 

बीड : ग्रामपंचातीला मोठ्या प्रमाणात निधी मिळत असतो. मात्र या निधीमध्ये अपहार करून भ्रष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप सरपंच पतीवर करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील आरणविहीरा तागडखेल ग्रामपंचायत येथील हा प्रकार असून सरपंच पतीचा मनमानी कारभाराच्या विरोधात गावातील सामाजिक कार्यकर्ते उध्दव कारभारी शिरसाठ यांनी ग्रामपंचायत समोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. 

ग्रामपंचायतींच्या विकास कामासाठी १५ वित्त आयोगाचा निधी थेट दिला जात असतो. तर ग्रामपंचातीवर महिला सरपंच असल्यास त्यांच्या पतीकडूनच ग्रामपंचायतींचा कारभार चालविला जात असतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्ट्राचार केला जात असल्याचे देखील समोर आले आहे. अशाच प्रकारे बीडच्या आष्टी तालुक्यातील अरविहीरा तागडखेड येथील सरपंच पती यांनी मनमानी कारभार केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. 

काम न करता बिले काढल्याचा आरोप 

अरविहीरा तागडखेड ग्रामपंचायतमध्ये असलेल्या सरपंच पतीने विकास कामांच्या निधीत भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. गावातील योजनेचे काम न करताच बिले उचलून घेतले आहे. यामध्ये ग्रामपंचायत १५ वित्त आयोग, पवनचक्की फंड, सौरउर्जा फंडातूनाची अफरातफर करत सुमारे ३५ लाख रुपयांचा भ्रष्ट्राचार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. 

कामांची चौकशीची मागणी 
दरम्यान सदर बिलांची चौकशी करून कामे तात्काळ करावी; आशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उध्दव कारभारी शिरसाठ यांनी केली आहे. तसेच याबाबत वेळोवेळी माहितीचा अधिकार देऊन सुध्दा चार ते पाच महिन्यापासून माहिती मिळत नाही. जवळपास आठ ते दहा विविध कामांची चौकशी व्हावी. तसेच तात्काळ सर्व कामे करावेत; या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते उध्दव शिरसाठ व ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: स्ट्रीट क्राईमला लगाम; विठ्ठलवाडी पोलिसांचे मध्यरात्री कॉम्बिंग ऑपरेशन

Fact Check: हरभजन सिंगनं शेअर केलेला झोम्बी ड्रग्जचा VIDEO नेमका कुठला? व्हायरल व्हिडिओमागील सत्य भलतंच

Tea on empty stomach: सकाळी उठताच रिकाम्या पोटी चहा पिता? शरीराला होऊ शकतात ‘हे’ त्रास, आजच बदला तुमची ही सवय

Independence Day Movies: स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवा; देशभक्तीची भावना जागवणारे 'हे' ७ चित्रपट नक्की पाहा

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेच्या 24 व्या हप्त्याचा लाभ कुणाला मिळणार? कोणत्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो?

SCROLL FOR NEXT