Santosh Deshmukh Case Saam tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणी १९ मेस होणार पुढील सुनावणी; बीडच्या विशेष न्यायालयात झाली सुनावणी

Beed News : संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज होणार होती. मात्र विशेष न्यायाधीश पाटोदकर रजेवर असल्यामुळे न्यायाधीश शिंदे यांच्या कोर्टात सुनावणी ठेवण्यात आली

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौथी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयासमोर आज घेण्यात आली. मात्र न्यायाधीश पाटोदकर हे रजेवर असल्यामुळे हे प्रकरण विशेष न्यायाधीश शिंदे यांच्याकडे वर्ग करण्यात आले. सुनावणी घेत न्यायाधीश शिंदे यांनी या प्रकरणात पुढील सुनावणीसाठी १९ मे हि तारीख दिली आहे. 

बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरणाला १४० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. तरीही या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. तर देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा मुख्य आरोपी वाल्मिक कराड बीडच्या तुरुंगात आहे. या प्रकरणाची सुनावणी बीड येथील विशेष न्यायालयात सुरु असून या प्रकरणी आज सुनावणीची तारीख होती.

सुनावणी न होताच पुढील तारीख 

संतोष देशमुख हत्या प्रकरणाची चौथी सुनावणी बीडच्या विशेष न्यायालयामध्ये आज होणार होती. मात्र विशेष न्यायाधीश पाटोदकर हे रजेवर असल्यामुळे हे प्रकरण तात्पुरते न्यायाधीश शिंदे यांच्या कोर्टात सुनावणी ठेवण्यात आली होती. मात्र आजच्या दिवशी सुनावणी न होताच न्यायाधीश शिंदे यांनी देशमुख हत्या प्रकरणी सुनावणीसाठी १९ मे ही तारीख देण्यात आली आहे.

सरकारी वकीलही गैरहजर 

दरम्यान आजच्या सुनावणीसाठी सरकारी वकील उज्वल निकम हे देखील गैरहजर होते. त्यांच्या जागी विशेष सहाय्यक सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे यांनी काम पहिले. मात्र सुनावणीसाठी आरोपी वाल्मीक कराडचे वकील विकास खाडेकर हे देखील गैरहजर होते. तर आरोपी विष्णू चाटेचे वकील न्यायालयात हजर आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Alibaug Fort : समुद्राच्या लाटांमध्ये उभा असलेला ३०० वर्षांचा भव्य किल्ला! अलिबागला गेल्यावर 'हे' सिक्रेट ठिकाण नक्की पाहा

Easy Banana Cake Recipe : पिकलेल्या केळीपासून बनवा झटपट टेस्टी चॉकलेटी केक

2029 ला प्रयत्न करा, भाजपच्या दिग्गज नेत्याची विजय वडेट्टीवार यांना पक्षात येण्याची ऑफर; भर सभेत नेमकं काय घडलं?

Raksha Bandhan 2026: यंदाच्या रक्षाबंधनाला भावासाठी खरेदी करा चांदीची राखी; पाहा ७ लेटेस्ट डिझाईन्स

NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत मोठी अपडेट; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? शरद पवारांनी बोलावली तातडीची बैठक

SCROLL FOR NEXT