Beed Lok Sabha  Saam tv
महाराष्ट्र

Beed Lok Sabha : ज्योती मेटेंची माघार; बीडमध्ये आता तिरंगी लढतीची शक्यता

Beed News : ज्योती मेटेंच्या उमेदवारीची. मेटेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून थेट पवारांशी चर्चा सुरु केली.

Rajesh Sonwane

बीड : बीड लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्याबाबत चर्चा रंगात होती. (Beed) शिवसंग्रामच्या नेत्या यांनी शरद पवार यांच्याकडे उमेदवारी मागितली होती. परंतु बजरंग सोनवणे यांना शरद पवार (Sharad Pawar) यांनी उमेदवारी जाहीर केली. यानंतर ज्योती मेटे यांनी माघार घेतली असून आता बीडमध्ये तिरंगी लढत होण्याची  शक्यता आहे. (Latest Marathi News)

राज्याचे लक्ष लागलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात सर्वात आधी भाजपने पंकजा मुंडे यांना उतरवलं. त्या पाठोपाठ चर्चा सुरु झाली ती ज्योती मेटेंच्या उमेदवारीची. मेटेंनी आपल्याला उमेदवारी मिळावी म्हणून थेट पवारांशी चर्चा सुरु केली. (Lok Sabha Election) एकीकडे महायुतीशी संलग्न असलेल्या शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे यांनी असं शरद पवारांना भेटणं अन्‌‍ उमेदवारी मागणं सर्वांनाच धक्का देणारं होतं. पण हा धक्का भेटीपुरताच मर्यादित राहिला आणि अचानक बजरंग सोनवणे यांनी थेट शरद पवारांच्या (NCP) राष्ट्रवादीत प्रवेश केला. यामुळे ज्योती मेटेंबरोबरच सोनवणे ही उमेदवारीच्या स्पर्धेत उतरले. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ज्योती मेटे चर्चेच्या फेऱ्या करत असताना राष्ट्रवादीने सोनवणेंची उमेदवारी जाहीर केली. यानंतर ज्योती मेटे यांनी मतदार संघात दाखल होत चाचपणी केली अन्‌‍ माघारीचा निर्णय जाहीर केला. हा निर्णय जाहीर करतांना त्यांनी व्यापक जनहित लक्षात घेवून मतविभाजन टाळण्यासाठी माघारीचा दावा मेटेंनी केला. त्यांनी घेतलेल्या या भूमिकेचे बजरंग सोनवणे यांनी देखील कौतूक केले असून त्यांच्या माघारीचा मला नक्की फायदा होईल; असं देखील सोनवणे यांनी म्हटले आहे.

आता महायुतीच्या (Pankja Munde) पंकजा मुंडे, महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे आणि वंचित बहुजन आघाडीचे अशोक हिंगे हे प्रमुख उमेदवार सध्या तरी मैदानात आहेत. यातून तिरंगी लढतीचेच संकेत मिळत आहेत. उमेदवारी दाखल करण्यासाठी अजून ३ दिवस बाकी असल्याने बीडची लढत तिरंगी होणार की चौरंगी; हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुंबईतील विजयी मेळाव्यासाठी नाशिकमध्ये मनसेकडून जोरदार तयारी

Maharashtra Politics: राज ठाकरे देश सोडून जाणार होते, पण आम्ही थांबवलं – रामदास कदम यांचा गौप्यस्फोट|VIDEO

Google Search Alert: 'या' ८ गोष्टी कधीही गुगलला विचारु नका, अन्यथा होईल मोठा गोंधळ

Diabetes kidney damage symptoms: डायबेटीजमुळे किडनी खराब होण्यापूर्वी शरीरात दिसतात 'हे' बदल; निकामी होण्यापूर्वी लक्ष द्या

पेट्रोल पंप मालकाच्या पाळीव कुत्र्याचा ग्राहकावर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ आला समोर

SCROLL FOR NEXT