Beed News
Beed News Saam tv
महाराष्ट्र

मराठा क्रांती ठोक मोर्चाचा परळीत आमदार सावंतांच्या समर्थनात रॅली

विनोद जिरे

बीड : बीडच्या परळीत मराठा क्रांती ठोक मोर्चा बंडखोर आमदार तानाजी सावंत यांच्या समर्थनात मोर्चा काढला. मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे यांच्या नेतृत्वाखाली परळी (Parali) शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (beed Rally of Maratha Kranti Thok Morcha in support of MLA tanaji Sawant in Parli)

समर्थकांनी "निर्णय तुमचा साथ आमची" अश्या आशयाचे फलक लावून त्यांच्या निर्णयाचे (Beed News) समर्थन देखील केल्याचे दिसून आले आहे. आमदार तानाजी सावंत यांच्या पुण्यातील कार्यालयावर काही दिवसांपूर्वी जो हल्ला करण्यात आला होता. त्याचा निषेध देखील यावेळी व्यक्त करण्यात आला. तर यापुढे असे भ्याड हल्ले खपून घेतले जाणार नाही. अन्यथा ठोक मोर्चाच्या माध्यमातून आम्ही चांगलाच हिसका दाखवू; असा इशारा देखील यावेळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे राज्य समन्वयक अमित घाडगे यांनी दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madhya Pradesh Election: निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय; 'या' चार जिल्ह्यांत फेरमतदान होणार

Horoscope: लग्नाचा योग, व्यवसायात यश; तुमच्या राशीत काय?

Todays Horoscope: व्यवहारात सतर्कता, जोडीदारासोबत प्रेमाने वागा; जाणून घ्या तुमच्या राशीत काय?

The Great Indian Kapil Show बंद पडणार आहे का? अर्चना पूरण सिंहने व्हिडिओ शेअर करत सांगितलं सत्य

TVS Iqube EV ची वाढली मागणी, 32 लिटर स्टोरेज आणि 78 Kmph टॉप स्पीड; जाणून घ्या किती आहे किंमत

SCROLL FOR NEXT