NCP District President Bala Bangar saam tv
महाराष्ट्र

Beed News: मोर्चा काढू नका म्हणून 'अजित पवार' यांचा दबाव! राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा गंभीर आरोप

Beed News: राष्ट्रवादीने आज जिल्हा प्रशासन आणि आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला.

विनोद जिरे

>>विनोद जिरे

Beed News: बीड जिल्ह्यात जलजीवन योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार आणि अनियमित्ता सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रवादीने आज जिल्हा प्रशासन आणि आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या विरोधात मोर्चा काढला. मात्र हा मोर्चा काढू नका म्हणून सीईओ अजित पवार यांच्यासह अधिकाऱ्यांनी माझ्यासह कुटुंबावर दबाव टाकला, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांनी केला आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर म्हणाले की, बीड जिल्ह्यात जलजीवन योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरकारभाराच्या तक्रारी समोर येत आहेत. या जलजीवन योजनेला व्यवस्थित सुरुवातही झाली नसताना कंत्राटदारावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले गेले आहेत. असेच प्रकार घडत राहिले तर बीड जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा ही ओळख कायम राहील.

बाळा बांगर यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार हे नियम डावलून अनेकांना बोगस पद्धतीने काम वाटप करत असून या योजनेतून कोट्यावधी रुपयांचा अपहार होण्याचे प्रकार समोर येत असल्याचा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

दरम्यान सीईओ अजित पवार यांनीच मोर्चा काढू नका म्हणून दबाव टाकल्याचा आरोप राष्ट्रवादी व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर केल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे. (Beed News)

बीडमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर जल धडक मोर्चा काढण्यात आला होता. हा मोर्चा शहरातील राष्ट्रवादी भवनपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते नगर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT