Beed Civil Hospital Saam tv
महाराष्ट्र

Beed News: जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाची वार्डातच आत्महत्या

जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णाची वार्डातच आत्महत्या

विनोद जिरे

बीड : बीड जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांनी खिडकीला (Beed News) गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. बाळू बहिर (वय ३८) असे आत्महत्या केलेल्या रुग्णाचे नाव आहे. (Latest Marathi News)

बाळू बहिर हे गेल्या काही दिवसांपासून किडनी निकाम्या झाल्याच्या आजारावर जिल्हा रुग्णालयात उपचार घेत होते. आजाराने त्रस्त असल्याने ते नैराश्यात गेल्याने त्यांनी हे कृत्य केले असल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्री कधी आत्महत्या केली हे कोणाच्या लक्षात आले नाही. सकाळी राउंडसाठी नर्स गेल्या असता त्यांच्या निदर्शनास ही घटना आली.

वार्डात रुग्णाने आत्‍मत्‍या केल्‍यामुळे खळबळ उडाली असून आत्महत्या करताना (Hospital) हॉस्पिटलमधील कर्मचारी स्टाफने पाहिले कसे नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान यावरून जिल्हा रुग्णालयातील कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG, 1st ODI: भारतानं घेतला पराभवाचा बदला; गिल, अक्षर आणि 'सुंदर'च्या खेळीनं टीम इंडियाचा विजय

NDA मध्ये सामील होण्याच्या चर्चेदरम्यान जयंत पाटील मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; भेटीमागील कारण काय?

MSRTC Bus Fire: खंडाळा घाटात धावत्या पुसद-अकोला एसटी बसला भीषण आग, चालकाच्या प्रसंगावधानाने वाचला 43 प्रवाशांचा जीव

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडका; मुंबईतील तीन सुप्रसिद्ध हॉटेल्सचा परवाना रद्द

Strait of Hormuz : होर्मुझमध्ये आता 'ट्रम्प टॅक्स', जहाजांवर अमेरिका 20% शुल्क लावणार, इराणचा विरोध

SCROLL FOR NEXT