Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी; बसमध्ये १०० प्रवाशांचा धोकादायक प्रवास

कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांची तोबा गर्दी; बसमध्ये १०० प्रवाशांचा धोकादायक प्रवास

विनोद जिरे

बीड : बीड बसस्थानकातून कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांनी रात्री एकच गर्दी केली होती. बसमध्ये (St Bus) जवळपास १०० च्या वर प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागला. (Letest Marathi News)

महाराष्‍ट्र– कर्नाटक (Karnataka) सिमा वाद सुरू असताना बीड (Beed) बसस्‍थानकातून कर्नाटकला जात असलेल्‍या प्रवाशांची मोठी गर्दी होती. मिळेल तिथे उभे राहून दोन हाताने लटकून प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन कर्नाटक सरकारच्या बसमध्ये प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये मेंढरं कोंडल्यासारखे प्रवासी उभा ठाकले होते. हा धक्कादायक प्रकार साम टीव्हीच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

ऊसतोड कामगार प्रवाशी

प्रवाशांना विचारले असता यातील अनेक प्रवाशी हे ऊसतोड कामगार असल्याचे समोर आले. ऊसतोडीच्या ६ महिन्याच्या काळात कामगारांना असाच प्रवास करावा लागत असल्याचे देखील काहींनी सांगितले. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऊसतोडीच्या या ६ महिन्याच्या कार्यकाळात कर्नाटकला विशेष बस सोडाव्यात. अशी मागणी प्रवाशांनी केलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Special 26 च्या धर्तीवर बनावट आयकर छापा; 1 कोटींच्या खंडणी प्रकरणात 10 जणांना अटक

Skincare Tips : चेहरा सतत निस्तेज दिसतोय? स्किन केअर रुटीनमध्ये या सवयींचा समावेश

Maharashtra News Live Update: मराठवाड्याची कुणबी प्रमाणपत्र वाटपात मोठी झेप ! ३ लाख १६ हजारांहून अधिक प्रमाणपत्रे वितरित

Cleaning Tips : ऑफिसच्या किंवा शाळेच्या बॅगमधून कुबट वास येतोय? या सोप्या पद्धतीने करा डिप क्लीन

Horoscope: पुढील ३० दिवस 'या' ८ राशींसाठी ठरणार खास! सूर्य गोचरामुळे पैसा, करिअर आणि यशाचे योग

SCROLL FOR NEXT