Pankaja Munde News  - Saam Tv
महाराष्ट्र

Pankaja Munde News: पंकजा मुंडेंच्या मनात नेमकं चाललंय काय? सूचक विधानानंतर सर्वांच्याच भुवया उंचावल्या

Beed News In Marathi : पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे.

डॉ. माधव सावरगावे

Pankaja Munde News: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये मोठं वक्तव्य केलं आहे. 'धनंजय मुंडे आणि मी आम्ही दोघेही वेगवेगळे विचारधारात काम करत आहे. पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही,असं सूचक वक्तव्य पंकजा मुंडे यांनी केलं आहे . (Latest Marathi News)

परळी तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी पंकजा मुंडे यांनी बिनविरोध निवड झाली आहे. तर व्हाईस चेअरमनपदी राष्ट्रवादीचे चंद्रकात कराड यांची निवड झाली आहे. पंकजा मुंडे (Pankaja Munde) या चेअरमनपदी विराजमान होताच त्यांच्या समर्थकांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे.

दरम्यान, पंकजा मुंडे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पंकजा मुंडे म्हणाल्या, 'परळीचा कारखाना आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे कारखाना आर्थिक संकटात असताना शेतकऱ्यांच्या भल्यासाठी आम्ही एकत्र येत कारखान्याची निवडणूक बिनविरोध केली. माझे आणि धनंजयचे कौटुंबिक वैर नाही. ते राजकीय विरोधक आहेत. ते राहणार आहेत. आम्ही भविष्यात एकत्र येऊ की नाही हे सांगू शकत नाही. राजकारणात काहीही होतं. त्यांच्या आणि माझ्या भांडणाचा विषय नाही'.

'मी व्यक्तिगत कुणावरही आरोप केले नाहीत. पातळी सोडून धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केले नाहीत. आम्ही भांडत नाही. आम्ही दोघेही वेगवेगळे विचारधारात काम करतोय. पण भविष्यात काय होईल हे सांगता येत नाही. माझ्यावर अन्याय झाला? असे मी कधी म्हणाले नाही. आता पुढे काय होईल, ते पाहू? आज लोकांना उत्तर देण्याची म्हणून मी त्यांना सांगितले की बोलून सांगेन,असे पंकजा मुंडे पुढे म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

IAS तुकाराम मुंढे झाले 'रॉकस्टार'! 'द न्यू यॉर्क टाइम्स'च्या पहिल्या पानावर झळकले; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT