Beed News
Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: कृषी महोत्सवात अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून धिंगाणा; डोक्यावर बॉटल घेऊन डान्स

विनोद जिरे

बीड : राज्यात आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून बीड जिल्ह्याची ओळख पुढे येते. मात्र त्याच बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठीच्या (farmer) कृषी महोत्सवात स्वर झंकार कार्यक्रमाच्या नावानं आयोजक असणाऱ्या प्रकल्प संचालक सुभाष साळवे यांच्यासह तालुका कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क लावण्या हिंदी गाण्यांवर धिंगाणा घातल्याच (Beed News) पाहायला मिळालं. विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वीच कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली. याचं देखील भान या अधिकाऱ्यांना राहिलेलं नाही. (Live Marathi News)

शासनाकडून कृषी महोत्सव हा शेतकऱ्यांसाठी आयोजित केला जातो. या कृषी महोत्सवांमधून शेतकऱ्यांना नवीन प्रेरणा, कल्पना आणि शेती उपयोगी सर्वच माहिती मिळावी. यासाठी शासनाने लाखो रुपये खर्च करून या कृषी महोत्सवाचे आयोजन केलंय. मात्र याच शासनाच्या अधिकाऱ्यांनी हे भान सोडून बेभान होत धिंगाणा घातला. यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांवर खुद्द मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी. अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

अधिकारी दारू पिल्यासारखे नाचले

कृषी महोत्‍सवात ‘अभि जिंदा हु तो पी लेने दो..’ या गाण्यात गेवराईचे तालुका कृषी अधिकारी डोक्यावर बॉटल घेऊन नाचत आहेत. तर इतर अधिकारी दारू पिल्यासारखं नाचत आहेत. तर चंद्रा..रात रंगीन ती रंगुनी या लावणीवर प्रकल्प संचालक (आत्मा) सुभाष साळवे हे तोंडात फुल धरून आणि फुल पुन्हा उंच फेकून आपली मौजमजा करत आहेत. दिलबर मेरे कबतक मुझे ऐसेही तडपाओंगे या गाण्यावर तालुका कृषी अधिकारी नाचत आहेत. तर झिंगाट गाण्यावर सर्वच अधिकारी इतर कर्मचारी नाचत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MI Playoffs Scenario: मुंबईला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी! सोप्या शब्दात समजून घ्या समीकरण

Live Breaking News : Raigad Voting : धाटाव येथे मतदानयंत्रात तांत्रिक बिघाड; ४५ मिनिटांनी मतदान पुन्हा सुरू

Datta Bharane Video : ६ वाजल्यानंतर तुम्हाला मायबाप कोण? इंदापुरात दत्ता भरणे यांची मतदारांना दमदाटी; व्हिडिओ व्हायरल

Baramati Lok Sabha: मतदानादरम्यान सुप्रिया सुळे पोहोचल्या अजित पवारांच्या घरी, कुटुंबीयांच्या भेटीनंतर काय म्हणाल्या?

Boycott Election : बाळगंगा प्रकल्पग्रस्तांचा लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार; प्रांताधिकाऱ्यांची बैठक असफल

SCROLL FOR NEXT