Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : स्वस्त धान्य दुकानात निकृष्ट धान्य; तांदळाची खिचडी शिजवून तहसीलदाराच्या टेबलवर ठेवत आंदोलन

Beed Ration News : बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर सर्वसामान्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. तक्रार करून देखील चांगल्या धान्याचा पुरवठा केला जात नसल्याचे समोर आले आहे.

विनोद जिरे

बीड : शासनाकडून पुरवठा होणारे स्वस्त धान्य दुकानातील धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. बीड जिल्ह्यात देखील हा प्रकार समोर आला असून या विरोधात सामाजिक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. हा प्रकार प्रशासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची खिचडी बनवून तहसीलदारांच्या टेबलावर आणून ठेवली आहे. 

बीड जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर सर्वसामान्यांना निकृष्ट दर्जाचे धान्य वाटप होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याच प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयाबाहेर स्वस्त धान्य दुकानातील तांदळाची खिचडी शिजवली. यानंतर हि खिचडी तहसीलदारांना भेट दिली. ही खिचडी थेट तहसीलदाराच्या टेबलवर मांडत त्यांना या प्रश्नावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.

बीड तालुक्यातील अंजनवती, चराटा, काळेगाव हवेली यासह इतर गावांमध्ये निकृष्ट दर्जाचे स्वस्त धान्याचे वितरण होत आहे. याबाबत तक्रार करून देखील चांगल्या धान्याचा पुरवठा केला जात नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामस्थांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी हे लक्षवेधी आंदोलन केले आहे. दक्षता समिती केवळ कागदोपत्री असून ती सक्षम केली जावी, जेणेकरून यावर नियंत्रण होईल. असे मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. 

चौकशी करून दोषीवर कारवाई करणार

दरम्यान सामाजिक कार्यकर्त्यांनी आंदोलन करत धान्याबाबत केलेल्या मागण्यांवर आपण सकारात्मक निर्णय घेणार असून सर्वच दुकानदारांना लेखी सूचना देणार असल्याचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी म्हटले आहे. तसेच चौकशी करून दोषीवर कारवाई करणार असल्याचे आश्वासन देखील आंदोलनकर्त्यांना दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदीय समित्यांमध्ये मोठा फेरबदल;महाराष्ट्रातील ४० खासदारांना १५ समित्यांवर संधी, सुप्रिया सुळेंवर मोठी जबाबदारी, वाचा संपूर्ण यादी

मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगितलं होतं; राहुल गांधींनी केलं ट्विट

शिंदेंच्या आमदाराचे समर्थक महिलांना त्रास देतात, भाजपच्या महिला आमदाराचा खळबळजनक आरोप

मुलांच्या संगोपनासाठी पुरूषांनाही 365 दिवस सुट्टी? महिला आयोगाची केंद्र सरकारकडे मोठी शिफारस

बोगस शिक्षक भरती प्रकरणातील मुख्य सूत्रधार सापडला; शिक्षणमंत्र्यांच्या गावातच ठोकल्या बेड्या

SCROLL FOR NEXT