Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed : व्याजाची रक्कम देऊनही सावकाराचा त्रास; सावकाराचे नाव चिठ्ठीत लिहून संपवले जीवन

Beed News : बीड शहरात अवैध सावकारीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे चित्र बीड शहरात पहावयास मिळत आहे. सावकार व्याजाने पैसे देऊन अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: अवैध सावकारीचा जाच वाढत चालला आहे. व्याजाने पैसे दिल्यानंतर त्याची परतफेडीच्या मागणीसाठी समोरच्याकडे वारंवार तगादा लावला जात असतो. मात्र पैसे मागण्याचा त्रास अधिक वाढल्याने त्रासाला कंटाळून एकाने जीवन संपविल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवत त्यात सावकाराच्या नावाचा देखील उल्लेख करण्यात केलेला आहे. 

बीड शहरात अवैध सावकारीचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरले असून यावर कोणाचाच अंकुश राहिला नसल्याचे चित्र सध्या बीड शहरात पहावयास मिळत आहे. सावकार व्याजाने पैसे देऊन अव्वाच्या सव्वा रक्कम वसूल केली जाते. काही सावकार तर रोजाने, तासावर, फेडीवर तर काही महिनेवारी परतफेडीवर पैसे देतात. वेळेवर व्याज नाही दिले तर व्याजावर परत व्याज लावून रक्कम वसुली करत शिवीगाळ व धमकी देखील दिली जाते.

बीड शहरातील शनिवार पेठ काळा हनुमान ठाणा परिसरातील रहिवासी रामा दिलीपराव फटाले (वय ४२) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे. रामा फाटले हे कपडा व्यवसाय करत होते. जिल्ह्यातील आठवडी बाजारात मध्ये जाऊन कपडे विक्री करत होते. त्यांनी कपडा व्यवसायासाठी सावकाराकडून पैसे घेतले होते. पैसे वेळेवर न दिल्याने सावकाराने त्रास दिल्याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून गळफास घेऊन जीवन संपवले. सदरची घटना ६ जुलैला घडली आहे.

व्याजाची रक्कम देऊन देखील तगादा 
सावकारांना वेळेवर व्याज देऊन देखील शिवीगाळ व त्रास दिल्याने फाटले यांनी गळफास घेऊन जीवन संपवले. रामा फटाले यांनी काही पतसंस्थाकडून कपडा व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतु सावकाराने पैसे देताना चेक घेतले होते. व्याजाच्या पैशांची परतफेड करून देखील सावकार चेक परत न देता उलट व्याजाचे पैसे वेळेवर न दिल्याने व्याजावर व्याज द्यावे; अशी मागणी करत शिवीगाळ केल्याने आज राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवले असल्याचे लिहून ठेवलेल्या चिट्ठीत म्हटले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SSC Exam : पुण्यातच दहावीचे २ पेपर फुटले, टेलिग्रामवरच्या अॅडमिनवर गुन्हा

Maharashtra Live News Update : सिलिंडरचा काळाबाजर रोखण्यासाठी सरकारकडून उपाययोजना

Dahi Misal Pav Recipe : स्ट्रीट स्टाइल दही मिसळ घरी कशी बनवाल? फॉलो करा 'ही' स्टेप बाय स्टेप रेसिपी

'तू फ्रिजमध्ये सापडशील...' बॉयफ्रेंडच्या त्रासाला कंटाळून डेंटिस्ट तरुणीची आत्महत्या; ६ पानांच्या सुसाईड नोटने मुंबई हादरली

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना ₹३००० मिळणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT