Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : बजरंग सोनवणे भाजपला मॅनेज; मनसेचे सुमंत धस यांचा गंभीर आरोप

Beed News : विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत

विनोद जिरे

बीड : बजरंग सोनवणे हे भाजपला मॅनेज आहेत. खासदार सोनवणे यांनी मॅनेज होऊन केज मतदार संघासह जिल्ह्यातील काही विधानसभा मतदारसंघावर उमेदवार दिले आहेत. यामुळेच केजमध्ये शरद पवारांची सभा झाली नाही; असा गंभीर आरोप मनसेचे सुमंत धस यांनी केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या प्रचार सभा होऊ लागल्या आहेत. या प्रचार सभांमधून एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. याच दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Beed News) बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे (Bajarang Sonawane) यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. यामुळे बीड जिल्ह्यात चर्चा रंगू लागल्या आहेत. 

केजमध्ये मनसेचे इंजिन धावणारच 

दरम्यान (MNS) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे केज मतदारसंघाचे उमेदवार रमेश गालफाडे यांचे चिन्ह असलेले इंजिन असून ते केज मतदारसंघातून धावणारच आहे. जनतेला वेड्यात काढायचे काम या दोघांनी केले. त्यामुळे येणाऱ्या काळात केज मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुलाल उधळेल; असा विश्वास देखील यावेळी मनसेचे उमेदवार रमेश गालफाडे यांच्यासह सुमंत धस यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Fort : कुछ तुफानी करते है! 'हा' किल्ला चढताना काळजाचा ठोका चुकतो, २,२५० फूट उंचीवरचा थरारक ट्रेक

Maharashtra News Live Update: साखरेच्या दरवाढीत २२ ते २५ हजार कोटींचा घोटाळा? राजू शेट्टींचा गंभीर आरोप

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाआधी खुशखबर, कोणत्याही क्षणी खात्यात हप्ता जमा होणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

Swine flu symptoms: देशभरात वाढतोय स्वाईन फ्लूचा धोका; ही 4 लक्षणं दिसली तर लगेच व्हा सावध

September Picnic Spots : सप्टेंबरमध्ये फिरण्यासाठी 'ही' ५ ठिकाणं ठरतील बेस्ट, आजच प्लान करा ट्रिप

SCROLL FOR NEXT