Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News: आरोप सिद्ध करावा, अन्यथा राजीनामा द्यावा; मंत्री अतुल सावेंचे आमदार आजबेंना खुले आव्हान

आरोप सिद्ध करावा, अन्यथा राजीनामा द्यावा; मंत्री अतुल सावेंचे आमदार आजबेंना खुले आव्हान

विनोद जिरे

बीड : बीडचे पालकमंत्री निधी देण्यासाठी टक्केवारी घेतात. असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे (Balasaheb Ajabe) यांनी केला होता. त्यावर आता मंत्री अतुल सावेंनी त्यांना खुले आव्हान दिलं आहे. तुम्ही आरोप सिद्ध करा, अन्यथा पदाचा (Beed News) राजीनामा द्यावा; असं म्हणत अतुल सावे यांनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबे यांना पत्रक काढत खुलं आव्हान दिलं आहे. (Breaking Marathi News)

मंत्री अतुल सावे यांनी या काढलेल्या पत्रकात म्हटले, की आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे यांनी बिनबुडाचे आरोप राजकीय आकसातून केले आहेत. पालकमंत्री म्हणुन बीड जिल्ह्यात कामे करतांना सर्व आमदारांना विकास निधीचे वाटप केले आहे. (NCP) विकास निधी देतांना आम्ही राजकिय दुराग्रह केला नाही. या उलट अजबे यांची सत्ता असतांना आमच्या आमदारांना विकास निधी मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले.

स्‍टंटबाजीतून आरोप

केवळ राजकिय स्टंन्टबाजी करतांना केलेले आरोप बिनबुडाचे असून आरोप सिद्ध करून दाखवा, अन्यथा आमदारकीचा राजीनामा द्या. असे म्हणत पालकमंत्री अतुल सावेंनी राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब आजबेंना खुले आव्हान दिले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT