Majalgaon Rain Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Rain : माजलगावमध्ये ढगफुटी; गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली, गावांमध्ये पाण्याचा वेढा

Beed News : जोरदार पाऊस झाल्याने अनेक भागात पाणी साचले आहे. परिणामी नागरिकांना देखील शेजारी असलेल्या घरांमध्ये आसरा घ्यावा लागला आहे. तर प्रशासनाकडून देखील सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले

Rajesh Sonwane

योगेश काशीद 
बीड
: बीड जिल्ह्यात मध्यरात्री ढगफुटीजन्य पाऊस झाला. बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव, धारूर, वडवणी, परळी या भागामध्ये जोरदार पाऊस झाल्याने माजलगावमधील गंगामसला येथील मोरेश्वर मंदिर पाण्याखाली गेले असून नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर काही गावांमध्ये देखील पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर धारूर आणि हिंगनी कांदेवाडी दहिफळ गावांमध्ये पाण्याचा वेढा बसला असून नागरिकांना आणि शेतकऱ्यांना जिल्हा प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून जनावरे व सुरक्षित जागी नेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. जिल्ह्यामध्ये सर्वच ठिकाणी नदी नाल्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून नागरिकांनी काळजी घ्यावी अशी आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जोड कालवा फुटल्याने शेतात पाणी 

बारामतीच्या इंदापूर तालुक्यातील काझड येथे जोड कालवा फुटल्याने शेतात पाणी गेले आहे. खडकवासल्याहून येणारा जोड कालवा फुटल्याने शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची शेतकऱ्यांची माहिती दिली. मध्यरात्रीच्या सुमारास कालवा फुटला आहे. दरम्यान इंदापूर तालुक्यातील सणसर येथे देखील ओढ्याचं पाणी घरात गेले आहे. यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. 

औंढा तालुक्यातील दहा गावांचा संपर्क तुटला
हिंगोलीत सलग चौथ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. औंढा तालुक्यातील, गोळेगाव, अंजनवाडी, बेरोळा, कोंडशी एकबूर्जवाडी गावांचा थेट संपर्क तुटला आहे. तर गोजेगावमध्ये तलावाचे पाणी गावाच्या मधोमध असलेल्या पुलावरून वाहत असल्याने निम्म्या गवाचा गावकऱ्यांशी मागच्या ७२ तासापासून संपर्क तुटलेला आहे. त्यामुळे अनेकांची जनावरे देखील गावाच्या पलीकडेच मुक्कामी ठेवण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पेणमध्ये दिव्यांग मुलांनी फोडली दहीहंडी; ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष

Salman Khan: 'हे तुझं काम नाही..'; बिग बॉस २०च्या प्रीमियर शूटिंगदरम्यान सलमान खान संताप, व्हिडिओ व्हायरल

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! किसान कार्ड नसल्यास ₹6000 हजारांचा हप्ता मिळणार नाही, 32 लाख शेतकरी चिंतेत

Pune News: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, डीजे प्रकरणी पहिला गुन्हा दाखल

Mumbai : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी! पाणीपातळी ९५.८९ टक्क्यांवर , सातही धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा शिल्लक?

SCROLL FOR NEXT