St Employee
St Employee Saam tv
महाराष्ट्र

आघाडी सरकार कोसळले अन्‌ एसटी कर्मचाऱ्यांनी फोडले फटाके

विनोद जिरे

बीड : तीन पक्षाने एकत्र येऊन स्थापन केलेले महाविकास आघाडी सरकार अखेर कोसळले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःहून राजीनामा दिला असून हे सरकार कोसळल्याने बीडमध्ये एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद उत्सव पाहायला मिळाला. बीडच्या (Beed) माजलगावमध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी (St Employee) फटाके फोडत पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला. (beed news maharashtra government collapsed and the ST workers exploded firecrackers)

राज्‍यातील आघाडी सरकार (Mahavikas Aaghadi) कोसळल्‍याबाबत एसटी कर्मचारी म्हणाले, की आज खऱ्या अर्थाने एसटी कामगारांचा विजय झाला असे म्हणावे लागेल. आमचे 5 महिने आंदोलन झाले; मात्र याची दखल सरकारने घेतली नाही. उलट आमचे म्हणणे मांडणाऱ्या ॲड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई केली. त्यानंतर ते देखील म्हणाले की हे सरकार टिकणार नाही. त्यांनी केलेले भाकीत शेवटी सत्य झाले. त्यामुळे आज आम्ही फटाके वाजवून व पेढे वाटून आनंद साजरा केला असून आता या सरकारने तरी आम्हाला न्याय द्यावा. अशी अपेक्षा कर्मचाऱ्याने व्यक्त केलीय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Relationship Tips : वेळीच नाही बोलणे शिकून घ्या; आयुष्यभर आनंदी रहाल

Today's Marathi News Live : यवतमाळला चार दिवसांचा येलो अलर्ट

Petrol Diesel Rate (6th May 2024): निवडणूक काळात पेट्रोल-डिझेलच्या किमतीत घट? जाणून घ्या राज्यातील आजचा भाव

Sambhajinagar Accident : लग्न सोहळ्याहून परत येताना आई-मुलावर काळाचा घाला; टेम्पोची दुचाकीला धडक

Breaking News: अमेठीत काँग्रेस कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या १० ते १२ वाहनांची तोडफोड; भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT