Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : झोपेतून उठताच दिसले भयानक दृश्य; अनेक ठिकाणी हळदी..कुंकू..लिंबू टाकून पूजा, गावात भीती

Beed News: झोपेतून उठताच दिसले भयानक दृश्य; गावात भीतीचे वातावरण, अनेक ठिकाणी हळदी..कुंकू..लिंबू टाकून पूजा

विनोद जिरे

बीड : आजही अनेक गावांमध्ये अंधश्रध्येतून पूजा केली जात असल्याचे समोर येत असते. असाच प्रकार बीडच्या (Beed) केज तालुक्यातील लाखा गावात उघडकीस आला असून गावात मोक्याच्या जागेवर तसेच घरासमोर हळदी, कुंकू व लिंबू टाकुन पूजा केल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले आहे. अंधश्रद्धेतून जादूटोण्यासारखा अघोरी प्रकार केल्याचे बोलले जात आहे. (Breaking Marathi News)

एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनसाठी (Anis) अनेकांचे जीव गेले असतांना दुसरीकडे आजही गाव खेड्यात जादूटोण्यासारखी अंधश्रद्धा दिसून येत आहे. त्यामुळं पुन्हा एकदा अंधश्रद्धा विषय ऐरणीवर येत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात देखील हा प्रकार समोर आला आहे. यामुळे (Kej) असा भोंदूपणा करणाऱ्या अंधश्रद्धाळू व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, अशीच मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून होत आहे.

बीड जिल्ह्यातील लाखा गावातील ग्रामस्थ आज सकाळी झोपेतून उठल्यानंतर रस्त्यावरील हा प्रकार पाहिल्यानंतर धक्काच बसला. गावात अनेक ठिकाणी पूजा केल्याप्रमाणे चौकोन काढून त्यावर हळदी, कुंकू, गुलाल सुदृश्य दिसून असल्याने खळबळ उडाली आहे. तर सदरील हा प्रकार नेमका काय आहे? रात्रीतूनच हा प्रकार कुणी केला ? हे अद्याप समजले नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SBI Recruitment: बँकेमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, SBI मध्ये २०७ पदांसाठी भरती; लाखो रुपये मिळवा पगार

Maharashtra News Live Update: सत्ताधारी पक्षाच्या माजी महापौरांचे उपायुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या

Gavar Side Effects : गवार खाणं 'या' लोकांसाठी ठरू शकत धोकादायक! 'ही' ६ कारणे वेळीच घ्या जाणून

Konkan Forts : समुद्राच्या लाटांपासून जंगलाच्या कुशीत, कोकणातील 'हे' ५ किल्ले आहेत खूपच खास

LPG Cylinder : शहरी आणि ग्रामीण भागातल्या LPG ग्राहकांना दुसरा गॅस सिलिंडर कधी बुक करता येणार? नवीन अपडेट समोर

SCROLL FOR NEXT