Beed Child Marriage Saam tv
महाराष्ट्र

Beed Child Marriage: धक्कादायक.. बीडमध्ये भाजप नेत्यांनीच लावला बालविवाह; भाजप नेत्यांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल

धक्कादायक.. बीडमध्ये भाजप नेत्यांनीच लावला बालविवाह; भाजप नेत्यांसह ३२ जणांवर गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : बीडच्या आष्टीमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला. चक्क भाजपच्या (BJP) नेत्यानेच बालविवाह (Child Marriage) लावल्याची घटना समोर आली आहे. या धक्‍कादायक प्रकारात ३२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Maharashtra News)

बालविवाह रोखण्याचे पोलिसांसमोर आव्‍हान आहे. बीड जिल्‍ह्यामध्‍येच गेल्‍या महिनाभरात ३० अधिक बालविवाह रोखण्यात आले आहेत. तरी देखील बीडच्‍या आष्‍टी तालुक्‍यात बालविवाह पार पडल्‍याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्‍हणजे भाजप नेत्‍यानेच हा विवाह लावून दिल्‍याचे समोर आले आहे.

ग्रामसेवकाने दिली फिर्याद

आष्टी तालुक्यातील वेताळवाडीमध्ये हा बालविवाह लावण्यात आला. याप्रकरणी आता भाजप नेता विजय गोल्हार (Beed) यांच्यासह नवरी व नवरदेवाचे आई- वडिल, फोटोग्राफर, आचारी, भटजी यांच्यासह ३२ लोकांवर ग्रामसेवक शंकर मुरलीधर म्हेत्रे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान भाजप नेते विजय गोल्हार हे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सविता गोल्हार यांचे पती असून ते स्वतः देखील नेता आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: झारखंडमधील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा - अभिजीत दिपके

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT