missing 
महाराष्ट्र

बापरे..अकरा महिन्‍यात ६९२ जणांनी ठोकली धूम; प्रेमप्रकरणाचे प्रमाण अधिक

बापरे..अकरा महिन्‍यात ६९२ जणांनी ठोकली धूम; प्रेमप्रकरणाचे प्रमाण अधिक

विनोद जिरे

बीड : बीड (Beed) जिल्ह्यात मागच्‍या अकरा महिन्यांत तब्बल ६९२ जण बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बेपत्ता होणाऱ्यात महिला व मुलींचे प्रमाण अधिक असून त्या तुलनेने पुरुषांची संख्या कमी आहे. यामध्ये प्रेमप्रकरणांतून धूम स्टाईल पलायन केलेल्या महिला-मुली अन्‌ तरुण पुरुषांची संख्या अधिक आहे. तर हे बेपत्ता तरुण- तरुणी मोठमोठ्या शहरात असल्याचा अंदाज आहे. (beed-news-In-last-eleven-months-692-people-missing- More-love-affair)

काही कारणात्‍सव घरातून न सांगता अनेकजण पळून जात असतात. यात काहीजण अगदी शुल्‍लक कारणावरून देखील गायब होत असतात. या पलायनाची प्रेमप्रकरणासोबतच कौटुंबिक कलह, दारिद्र्य, व्यसनाधीनता व वाईट तरुण- तरुणींच्या कौटुंबिक संगत आहेत.

५६३ सापडले

गेल्या अकरा महिन्यात नोव्हेंबर अखेर ४१९ महिला-मुली व २७३ तरुण मुले व पुरुष बेपत्ता झाले आहेत. तर यापैकी ५६३ जणांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलंय. मात्र अद्यापही ८३ महिला-मुली व ४६ तरुण मुले- पुरुष बेपत्ता आहेत. दरम्यान न सापडलेल्या व्यक्तींचा शोध घेत असल्याची माहिती पोलीस (Police) सूत्रांनी दिलीय.

कोणत्या महिन्यात किती बेपत्ता

जानेवारी - 68

फेब्रुवारी - 70

मार्च - 68

एप्रिल - 46

मे - 40

जून - 71

जुलै - 45

ऑगस्ट - 74

सप्टेंबर - 69

ऑक्टोबर - 67

नोव्हेंबर - 44

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सुरक्षारक्षकांचा आवाज उठवल्यानं गुन्हा दाखल; पवई हिरानंदानी परिसरातील देशमुखांच्या 'त्या' राड्यावर पत्नीचा मोठा खुलासा

इंडिगोची धडाधड उड्डाणं रद्द; कधीपर्यंत पूर्ववत होईल इंडिगोची सेवा,सीईओंनी दिली महत्त्वाची माहिती

शिक्षकांचा एल्गार, 80 हजार शाळांना कुलूप, शिक्षकांनी का पुकारला बंद?

वरळीतील पंचतारांकित हॉटेलमध्ये ठाकरेसेना–भाजप राडा! कामगार युनियनवरून वाद चिघळला

अंधारात मोबाईलवर बोलणं आलं अंगलट, बिबट्याच्या हल्ल्यात तरुण जखमी

SCROLL FOR NEXT