Beed Majalgaon Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Beed News: बायकोच्या जाचाला कंटाळून नवऱ्याने घेतलं विष; सासूरवाडीतच संपवलं जीवन, बीडमधील धक्कादायक घटना

Beed Crime News: मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावयाने बायकोच्या तसेच सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली.

विनोद जिरे

Beed Majalgaon Crime News

मुलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी सासूरवाडीत आलेल्या जावयाने बायकोच्या तसेच सासरकडील मंडळींच्या त्रासाला कंटाळून विषारी द्रव्य प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील बाभळगाव येथे घडली. याप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात दिंद्रुड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नितीन विनायक शेळके वय 32 रा. लोणी, ता. परतूर जि. जालना असं मयत जावयाचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, नितीन शेळके याचा विवाह माजलगाव (Beed News) तालुक्यातील श्रीक्षेत्र बाभळगाव येथील रूपाली रुस्तुम सुरवसे हिच्यासोबत 2020 साली झाला होता.

6 महिन्यांच्या सुखी संसारानंतर पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. पत्नी रुपालीने पती नितीकडे वेगळे राहण्यासाठी तगादा लावला होता. तसेच शेत वाटून घे म्हणून पत्नी व सासरची मंडळी त्याला वारंवार मानसिक त्रास द्यायची.

दरम्यान, दुसऱ्या बाळंतपणासाठी रुपाली माहेरी बाभळगाव येथे आली होती. त्यांची मोठी मुलगी नेहा हिचा वाढदिवस असल्याने नितीन सासरवाडीला आला होता. यावेळी पत्नीने त्याच्याशी किरकोळ कारणावरून वाद घातला.

तसेच त्याला पत्नी रूपाली, सासू आशाबाई रुस्तुम सुरवसे, सासरा रुस्तुम सुरवसे व मेहुणा पवन रुस्तुम सुरवसे यांनी मानसिक त्रास दिला. त्यामुळे नितीनने सासरवाडीतच विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केली.

याप्रकरणी नितीनचा भाऊ प्रशांत विनायक शेळके यांच्या फिर्यादीवरून सासरच्या मंडळीविरोधात बीडच्या दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud-Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: मनोज जरांगे आज मोठा निर्णय घेणार, मुंबई पोलिसांनी आंदोलनाची परवानगी नाकारली

Ganeshotsav 2026 : गणरायाच्या आगमनाने महाराष्ट्र भक्तिमय, मुंबईपासून कोकणापर्यंत उत्साहाला उधाण

Maharashtra News Live Update: सांगलीमध्ये भीषण अपघात, कार वारणा नदीत कोसळली

konkan Fort : घोड्याच्या नालासारखा आकार असलेला किल्ला, रचना पाहून व्हाल थक्क!

Ladki Bahin Yojana: ४ दिवसांत लाडक्या बहि‍णींच्या खात्यात १५०० जमा होणार, ऑगस्टच्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर

SCROLL FOR NEXT