Majalgaon Rain Saam tv
महाराष्ट्र

Majalgaon Rain : पहिल्याच पावसात सरस्वती नदी दुथडी; बीडच्या माजलगाव परिसरात जोरदार पाऊस

Beed News : राज्यात मान्सून दाखल झाला असून राज्यातील पुणे, मुंबई, अकोला, बीडसह अन्य काही भागात जोरदार पाऊस होत आहे. तर काही भागात अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे

विनोद जिरे

बीड : राज्यात मान्सूनचे आगमन झाले झाले असून काही भागात मुसळधार पाऊस होत आहे. यात बीडच्या माजलगाव तालुक्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला. यामुळं माजलगावच्या कोथाळा गावातून वाहणारी सरस्वती नदी दुथडी भरून वाहू लागली आहे.

राज्यात मान्सून दाखल झाला असून राज्यातील पुणे, मुंबई, अकोला, बीडसह अन्य काही भागात जोरदार पाऊस होत आहे. तर काही भागात अजून देखील पावसाची प्रतीक्षा आहे. दरम्यान बीड जिल्ह्यात दोन दिवसांपासून पाऊस होत आहे. यात (Beed) बीडच्या माजलगाव तालुक्यात शनिवारी सायंकाळी जोरदार (Rain) पाऊस झाला. या पहिल्याच पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे देखील वाहू लागले आहेत. तर दुसरीकडे शेतामध्ये देखील पाणीच पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. 

पेरण्यासाठी लगबग 

बीड जिल्ह्यातील अनेक भागात मध्यरात्री पावसाने चांगलीच दमदार हजेरी लावली. मान्सूनच्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी (Farmer) शेतीची मशागतीचे काम पूर्ण केली आहेत. दमदार पावसानंतर पेरण्याचा कामाला वेग येणार आहे. दरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असून पेरण्या लवकर होतील, असा अंदाज शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shukraditya Rajyog: 2026 च्या सुरुवातीला बनणार शुक्रादित्य राजयोग; शुक्र-सूर्य या राशींना करणार करोडपती

Accident : सोनभद्रच्या खाणीत मोठी दुर्घटना, २ जणांचा मृत्यू, ढिगाऱ्याखाली १५ जण गाडल्याची भीती

भाजपनं व्होटचोरीतून निवडणूक जिंकली? व्होटशेअरवरुन नव्या चर्चेला उधाण

Passport Service Change : पासपोर्ट सेवेत महत्वाचा बदल, केंद्र सरकारकडून मोठी घोषणा, जुन्या पासपोर्टचं काय?

७५ लाख महिलांच्या खात्यावर ₹ १०,०००; रेवडी वाटपावर पवारांचा सवाल, फडणवीसांचे उत्तर, वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT