Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed: विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव; सासरच्या लोकांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल

विवाहितेच्या आत्महत्येचा बनाव; सासरच्या लोकांवर अखेर खुनाचा गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : बीडच्या नरसिंह तांडा गावातील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. परंतु, सदर विवाहितेने आत्‍महत्‍या (Suicide) नव्हे तर तिचा खुन केल्‍याबाबतची तक्रारी माहेरच्‍या मंडळींनी (Crime News) केली होती. यावरून मृत महिलेच्‍या पतीसह सासरा, सासु, दिर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Beed Crime News)

बीडच्या (Beed) नरसिंह तांडा गावातील अंजली सुनील राठोड या विवाहितेचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. त्यावरून अंजली राठोड यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. मात्र सदरचा प्रकार हा आत्महत्या नसुन सासरच्या लोकांनी केलेला खुन आहे. असा आरोप मयत विवाहित मुलीच्या नातेवाईकांनी केला होता.

रास्‍ता रोकोनंतर गुन्‍हा दाखल

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा; यासाठी मयत मुलीच्या नातेवाईकांनी गेवराई शेवगाव महामार्ग अडवत रस्ता रोको केला होता. या प्रकरणी आता मयत मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून पती, सासू, सासरा, दिर यांच्यावर चकलंबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

LPG Gas Booking : सिलेंडरच्या बुकिंगचा मेसेज आलाय, पण DAC कोड खरा आहे की खोटा? कसं ओळखाल?

अनैतिक संबंधातून वहिनीला संपवलं, नंतर नेपाळमध्ये पलायन करण्याचं ठरवलं अन् कल्याण पोलिसांचा झारखंडमध्ये अटकेचा थरार

कल्याणमध्ये 5 भटक्या कुत्र्यांची निर्घृण हत्या; मृतदेह नाल्यात फेकल्याचा संतापजनक प्रकार

सत्ताधारी महिला आमदाराच्या ताफ्यावर हल्ला; भररस्त्यात गाडी अडवत केली जातीवाचक शिवीगाळ, सुरक्षा रक्षकांना मारलं

SCROLL FOR NEXT