Beed News Saam tv
महाराष्ट्र

Beed News : ठेवी बुडविणाऱ्या मल्टीस्टेट बँकांचे ठेवीदार रस्त्यावर; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता अडवत मांडला ठिय्या

Beed News : बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यातील नामांकित मल्टीस्टेट बँकांनी हजारो ठेवीदारांच्या कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत. याच विरोधात आज (Beed) बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर ठेवीदारांच्या वतीने दणका मोर्चा काढण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता अडवत ठिय्या मांडला.  (Live Marathi News)

बीड जिल्ह्यातील जिजाऊ, साईराम, ज्ञानराधा, राजस्थानी, मराठवाडा अर्बन, द्वारकादास नागरी यासह इतर मल्टीस्टेट बँकांनी गतवर्षी गाशा गुंडाळून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी बुडविल्या आहेत. या सर्व बँकांमध्ये (Bank) ठेवी परत मिळाल्या नसल्याने ठेवीदार आक्रमक झाले असून गेल्या अनेक दिवसांपासून ठेवीदार मल्टीस्टेट बँकांचे उंबरठे झिजवत आहेत. आपल्या हक्काचे पैसे मिळावे; अशी मागणी करत शेकडो ठेवीदार रस्त्यावर उतरले आहेत.  मल्टीस्टेट बँकेच्या संचालकांनी ठेविदारांचे पैसे न दिल्यास तीव्र लढा उभारण्याचा इशारा देण्यात आला. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दहा दिवसांची मुदत 

दरम्यान ठेवीदारांच्या सुरु असलेल्या आंदोलनस्थळी पतसंस्थाचे प्रतिनिधी आले होते. त्यांनी दहा दिवसाची मुदत मागितल्यानंतर ठेवीदारांच्यावतीने ती देण्यात आली असून ही मागणी मान्य न झाल्यास आता थेट आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा स्वाभिमानी संघटनेचे सचिन उबाळे यांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vidhan Parishad Result: बंडखोर खासदार आष्टीकरांना मोठा धक्का, विधान परिषद निवडणुकीत मुलाचा पराभव

Sanjay raut: “फडणवीसांच्या चेहऱ्यावरील हसू खोटं, भाजपमध्ये थेट ओपन वॉर सुरू”; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

ऑपरेशन टायगरनंतर शिंदेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये बंडखोर गितेंचा विजय; पराभवानंतर दराडेंचा भाजपवर 'दगाफटक्याचा' आरोप

Crime : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याचा हाफ एन्काउंटर, पोलिसांनी दोन्ही पायांवर झाडल्या गोळ्या

SCROLL FOR NEXT